अक्कलकोट – दहिटणे तालुका अक्कलकोट येथे दिनांक १० नोव्हेंबर रोजी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी प्रणय मित्तल, विशाल देव, विधी, शक्ती दुबे, रंगमंजु, डोणेपुडी विजयबाबू, यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. यादरम्यान धामगुंडे सावकार यांचा वाडा पाहून महाराष्ट्रीयन संस्कृती विषयी कुतूहल व्यक्त केले. त्याचबरोबर अंबाबाई मंदिर,हेमाडपंथी महादेव मंदिर पाहून आनंदित झाले.त्याचबरोबर अध्यक्षा सुवर्णा हुले यांच्या गुलाब महिला स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत बनवण्यात आलेल्या कडक भाकरी आणि शेंगा चटणीचा आस्वाद घेऊन महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचे कौतुक केले.
सदर अभ्यास दौऱ्यात ग्रामपंचायत अधिकारी अभिमन्यू ताड यांनी ग्रामपंचायतीची संपूर्ण व सविस्तर माहिती दिली. अंगणवाडी सेविका वर्षाराणी माने व अनुजा मोरे यांनी अंगणवाडीची संपूर्ण माहिती दिली.महिला बचत गटाविषयी अंबु कटकधोंड व रेश्मा चौधरी यांनी संपूर्ण माहिती दिली. तसेच शेती विषयी चनवीर बोधले व पोपसभट यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी संपूर्ण गावाचे उत्कृष्ट कार्य असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.
यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके , विस्तार अधिकारी संजय पाटील ,कक्ष अधिकारी दयानंद परिचारक, ग्रामपंचायत अधिकारी मोमीन, ग्रामपंचायत अधिकारी समर्थ हरणे,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी केले व आभार सरपंच नितीन मोरे यांनी मांडले .




















