अक्कलकोट – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , संचलित श्री हनुमान विद्यामंदिर , विद्यालयात राष्ट्रतेज श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. 12 जानेवारी ते सोमवार दि. 19 जानेवारी दरम्यान श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व भव्य क्रीडा महोत्सव आयोजित केली असल्याची माहिती क्रीडा विभाग प्रमुख श्री. श्रेयस पाटील यांनी दिली..
प्रारंभी सोमवार दि. 12 जानेवारी रोजी सकाळी ठीक 8 : 00 वाजता राष्ट्रतेज श्री स्वामी विवेकानंद, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन बंकलगी ग्रामपंचायतीचे सरपंच . चंद्राम सगरे, उपसरपंच नागनाथ कोणदे, मुख्याध्यापक ए. एम. हत्तुरे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश मदभावी, प्रगतशील शेतकरी माणिकराव देशमुख यांच्या हस्ते करून बंकलगीच्या प्रमुख मार्गावरून सवाद्य प्रभातफेरी काढण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजू सगरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रणजीत देशमुख, श्री हणमंत वाघमारे, आप्पाराव काळे, रेवणसिद्ध कोणदे, तंटामुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन चेंडके, श्रीकांत बनसोडे, .नागनाथ बनसोडे, आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती श्रेयस पाटील यांनी दिली .
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सोमवार दि. 12 जानेवारी ते सोमवार दि . 19 जानेवारी श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त भव्य क्रीडा महोत्सव आयोजित केले असून या स्पर्धेत क्रिकेट, कब्बडी, खो. खो., 500 मीटर धावणे, चित्रकला, रांगोळी, भाषण स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या पत्रकार परिषदेप्रसंगी पर्यवेक्षक अमोल भावसार, सहशिक्षिका श्रीमती एन. एस. राऊत , सौ सुप्रिया जामगे, सौ तृप्ती रूपनुरे , आदी उपस्थित होते.















