अक्कलकोट – ‘उठा उठा हो गावकऱ्यांनो चमत्कार झाला ! स्वामी समर्थ आला हो ‘.’ दिगंबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा ! ” “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ” अशी अनेक भक्ती पर भजने हुबेहुब देव देवतांची वेशभुषा सादर करीत नव वर्षीच्या पुर्व संधेला सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचा प्रारंभ तीर्थक्षेत्र अक्कलकोटी स्वामी नाम स्मरणात भजन सेवेत तल्लीन होत भाविकांनी इंग्रजीनव वर्ष २०२६ चे जल्लोषात स्वागत केले .
यानिमित्याने राज्यातील कोल्हापुर ‘पुणे ‘सांगली ‘ कराड , सातारा , नासिक ‘मुंबई , ठाणे ‘ सिंधुदुर्ग , रत्नागिरी ‘ अकोला अ नगर ‘ धाराशिव संभाजी नगर विविध भागातून भाविक अक्कलकोटी दाखल झाले होते अक्कलकोट नगरी भाविकांच्या प्रचंड संख्येने वाहनांनी जाम झाल्याचे दिसुन आले .
सरत्या वर्षाला निरोप नविन वर्षाचे स्वागत यासाठी मोठया प्रमाणात भाविक स्वामी चरणी नतमस्तक घेऊन इंग्रजी नविन वर्षारंभ समर्थाचे दर्शन आशिर्वाद घेण्यासाठी जमले होते . बुधवार सकाळ पासून दर्शनार्थ गर्दी होती देवस्था न चे विश्वस्त अध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांची दर्शन व्यवस्था कार्यरत होती.
अन्नछत्र मंडळ येथे लाखो भाविकासाठी संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसाद भोजन व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती . लाखो भाविकांनी स्वामी दर्शन महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला .
























