Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाळूज – साखरेवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

तरुण भारतbyतरुण भारत
February 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाळूज – मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वाळूज–साखरेवाडी या  सोलापूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या संपर्क रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. सुमारे चार किलोमीटर अंतरावरील या रस्त्यावर डांबरीकरणाचा नामोनिशानही उरलेला नाही. रस्त्याचा काही भाग पूर्णपणे उखडून गेलेला असून सर्वत्र मोठमोठे खड्डे, दगड आणि धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. परिणामी दैनंदिन प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून अपघातांचा धोका वाढला आहे.

वाळूज गावापासून साखरेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर काही ठिकाणी खडी टाकण्यात आली असली तरी त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय अधिक वाढली आहे. खडीतून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना विशेषतः मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या मधोमध भलेमोठे खड्डे पडलेले असून हा मार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.

दरवर्षीप्रमाणे ऊस वाहतुकीसाठी मोठी वाहने सुरू होताच रस्त्याची दुरवस्था अधिक प्रकर्षाने समोर येते. यंदाही त्याला अपवाद राहिलेला नाही. साखरेवाडी (ता. उ. सोलापूर हद्द) पर्यंतच्या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक तसेच पादचारी यांची मोठी तारांबळ उडत आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे अधिकच धोकादायक ठरत आहे.

या परिसरात अंदाजे १०० ते २०० घरे असून सुमारे दोन ते अडीच हजारांची लोकवस्ती आहे. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, गरोदर महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व आजारी रुग्णांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या खडीत घसरून किरकोळ जखमी झाल्याच्या घटनाही घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अनेक वेळा वाहने पंक्चर होण्याचे प्रकार वाढल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाळूज, जाधव वस्ती आणि भागाईवाडी येथील नागरिकांसाठी तसेच शेतकरी, विद्यार्थी व कामगार वर्गासाठी हा अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. विशेषतः पावसाळ्यात मातीच्या रस्त्यांवर पाय ठेवणेही अवघड बनते . मात्र संबंधित लोकप्रतिनिधी आणि खात्याचे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. हा रस्ता प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत आरसा बनला असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ‘भिजत घोंगडे’ का ठेवण्यात आले आहे, स्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून प्रशासन पूर्णपणे झोपलेले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर ठोस दबाव टाकून नागरिक व प्रवाशांच्या अडचणींचे तातडीने निवारण करावे,संबंधित विभागाने तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करावे आणि मार्ग वाहतुकीस योग्य बनवावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून जोर धरत आहे.

वाळूज–साखरेवाडी हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. पण सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शाळकरी मुले, रुग्ण आणि गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, ही आमची मागणी आहे.”

-हुसेन शेख,वाळूज 

चार किलोमीटरचा महत्त्वाचा संपर्क मार्ग गेल्या अनेक वर्षापासून  डांबरीकरणाविना आहे  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे.दरवर्षी ऊस वाहतूक सुरू झाली की या रस्त्याची खरी परिस्थिती समोर येते. मोठ्या वाहनांमुळे खड्डे अधिक वाढले आहेत. खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते, पण त्याने त्रासच वाढतो. अनेक वेळा वाहने पंक्चर होतात, अपघात होण्याची भीती कायम असते. लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी आमची ठाम मागणी आहे.”

-आनंद डोलारे 

Post Views: 23
Previous Post

रोटरी क्लब अक्कलकोट येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे यांची सदिच्छा भेट

Next Post

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

ताज्या बातम्या

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

February 18, 2026

‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला; अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!

February 18, 2026

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा निश्चित यश मिळेल – डॉ.  आडवीतोट

February 18, 2026

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

February 18, 2026

वाळूज – साखरेवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

February 18, 2026

रोटरी क्लब अक्कलकोट येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे यांची सदिच्छा भेट

February 18, 2026

लायन्स शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळा वार्षिक स्नेह संमेलन

February 18, 2026

तरुणाईने नात्यांकडे ‘डोळसपणे’ पाहणे काळाची गरज – मधुरा सलवारु

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685467

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697