कंधार / नांदेड – कऺधार न.पा.तील अतिशय म्हत्वाचा चार प्रभाग असून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार नगर परिषद ची प्रभाग क्रमांक चार ची उमेदवारी दिल्यास प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्व साकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे कंधार तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे [अजित दादा पवार ] गटाचे जेष्ठ नेते मधु पाटील डांगे हे आमचे स्थानिक प्रतिनिधी पञकार विनोद तोरणे याऺच्याशी वार्तालाप करताना म्हणाले.
मधु पाटील डांगे हे गेल्या विस वर्षापासुन राजकारणात सक्रिय आहेत. प्रभाग क्रमांक चार मध्ये त्यांचा दांडगा संपर्क असुन त्यांना माणनारा मोठा वर्ग आहे. आणि सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. मधु पाटील डांगे यांनी २००७ मध्ये वार्ड क्रमांक ७ मधुन नगर परीषदची निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांचा थोड्या मतानी पराभव झाला होता. मधु पाटील डांगे यांची सामाजिक व राजकिय क्षेञात स्वच्छ प्रतिमा आहे.
ते सर्वांच्या सुख दु:खात सामिल होवून सर्वांशी नेहमी सहकार्याची भावना ठेवतात त्यामुळे त्यांना सर्व स्तरातून मागणी होत आहे .त्यांनी प्रभाग क्रमांक चार मधुन निवडणुक लढवावी कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी उमेदवारी दिल्यास सर्व ताकदीनिशी निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधिशी बोलताना सांगीतले आहे.


















