Maharashtra, 8 जुलै (हिं.स.)।
8 जुलै 2024
वारकर्यांच्या सेवेतूनच विठ्ठल रूख्मिणीचे दर्शन
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे वारकर्यांची आरोग्य तपासणी प्रसंगी रणजित परदेशी यांचे प्रतिपादन
अहमदनगर, 8 जुलै (हिं.स.):- आज प्रत्येक वारकर्याला पंढरपुरच्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.शेकडो किलोमिटरच्या पायी प्रवास करत हे दिंडीतील वारकरी पंढरपुरकडे प्रस्थान करत आहेत.या प्रवासादरम्यान ठिक ठिकाणी या वारकर् यांची सेवा करण्यासाठी भाविक पुढे येत आहेत.वारकर्यांच्या सेवेतूनच विठ्ठल-रुख्मिणीच दर्शन होत आहे.हा आमच्यासाठी एक आनंददायी असाच क्षण आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,
रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या वतीनेही वारकर्यांना सर्वोतोपरि सुविधा देण्यात येत आहे.शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती नाथ दिंडीतील वारकर्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली.यापुढेही अहिल्यानगरमधून जाणार्या दिंडीतील वारकर्यांची विविध ठिकाणी मुक्कामी,मार्गावर आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न राहणार असल्या चे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख रणजित परदेशी यांनी केले.
पंढरपूरला जाणार्या दिंडीतील वारकर्यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख रणजित परदेशी,शहरप्रमुख रोहित लोखंडे,शहर समन्वयक ओंकार फुलसौंदर,काका शेळके,अनिकेत कराळे,उपशहरप्रमुख वसिम कुरेशी,अविनाश व्यवहारे,नगर तालुका प्रमुख सुभाष काकडे,डॉ.अमित महांडूळे,चंद्रकांत कपाले,समीर कुरमुडे,किरण जेव्हेरी,योगेश गोंधळी,गिरिष सोनी,रणजित भाव सार,विनायक बारटक्के,दिनेश सैंदर, मंगेश शिंदे,ओंकार शिंदे,महेश सातपुते,प्रविण पवार,निवृत्ती नाना गवळी आदि उपस्थित होते.
यावेळी रोहित लोखंडे म्हणाले,आषाढी एकादशानिमित्त पंढरपुरला जाणार्या दिंड्या अहिल्यानगर मधून जात आहे.यातील वारकर्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये,त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्य उत्तम रहावे,यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने वारकर्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्या वर औषोधोपचार केले जात आहे.यासाठी ठिकठिकाणी वारकर्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.अशीच सेवा विविध दिंडीनाही पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.या वारकर्यांची नवनागापुर येथील साई चैतन्य हॉस्पिटलच्यावतीने महाजनगल्ली येथील ज्ञानेश्वर सभागृहात ही तपासणी करण्यात आली.यामध्ये रक्तदाब,रक्तातील साखर,जनरल तपासणी करुन औषधे देण्यात आली.त्यानंतर चंद्रकांत कपाले यांच्यावतीने वारकर्यां साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.