तभा फ्लॅश न्यूज/देगलूर : देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2023-2024 खरीप हंगामातील पीकविमा वाटप करावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर उग्र व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अप्पर निवासी जिल्हाधिकारी अंबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, मुखेड शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर बिलोलीचे तालुका प्रमुख शिवकुमार बाबणे युवा सेना जिल्हा समन्वयक विपुल पटणे बिलोलीकर सगरोळीकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी खरीप हंगाम 2024 वर्षी शेतकरी बांधवांनी सावकारी, बिन सावकारी, बॅकेचे व्याजीबट्टी, कर्ज काढून महागामोलाचे बियाणे, खते खरेदी करून सोयाबीन, कापूस, उडीद, मुग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात मोठ्या आशेने पेरणी केली होती पण वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पीक वाया गेल्याने शेतकरी राजा कधी नव्हे एवढा आर्थिक संकटात सापडला होता यांची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्कालिन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खरीप हंगामातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम बोनस नुकसान भरपाई पिकविमा कंपनीने वाटप केले होते.
त्यातसुद्धा अनागोंदी, अनियमितीता, असल्याने असंख्य शेतकरी बांधवांना 25 टक्के रक्कमेपासुन सुध्दा वंचित राहावे लागले होते सध्या या वर्षीच्या खरीप हंगामातील शेतीसाठी लागणारे महागामोलाचे खते, बियाणे किटकनाशके खरेदी करून पेरणी केली आहे पावसाने पुन्हा पाठ फिरवून उघड पडल्याने या वर्षीचा खरीप हंगाम वाया जातो की काय अशी कोरडी दुष्काळी परिस्थिती दिसते आहे तरी पण निसर्गाच्या भरवशावर पुढील मशागत करण्यासाठी आर्थिक अडचण असल्याने मदत मिळणे गरजेचे आहे त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना अनुदानाच्या मदतीची अत्यंत गरज आहे गेल्या 5 वर्षा पासुन ओला दुष्काळ पडला असल्याने शेतकरी बांधवांना कोणी उसनवारी सुद्धा देत नाही.
थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅकासुद्धा बॅकेसमोर फटकू देत नाहीत अशा या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा हेच एक मदतीचा मार्ग राहील्या असल्याने ज्या शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई मिळाली अशा शेतकऱ्यांना व 25 टक्के रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा वाटप करण्यात यावा अन्यथा देगलूर, मुखेड, बिलोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर उग्र व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अप्पर निवासी जिल्हाधिकारी अंबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे, मुखेड शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर, बिलोली चे तालुका प्रमुख शिवकुमार बाबणे सगरोळीकर युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल पटणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे