कुर्डूवाडी – कुर्डूवाडी नगरपालीका निवडणूकीत सर्वच पक्षाच्या निडणूकीच्या प्रचारात रंगत आली असून प्रचार रँली, होम टू होम प्रचारावर भर दीला जात आहे.प्रभाग चार मधून सर्वसामान्य कुटुंबातुन आलेले ववगेली वीस वर्ष सामाजीक क्षेत्रामध्ये कार्य करत असलेले लक्ष्मण पवार हे निवडणूक रिंगणामध्ये बलाढ्य शक्तीला सामोरे जात आहेत.
अतीशय गरीब कुटुंबात जन्मलेले पवार यांना कामाच्या जिवावर नाही तर आर्थीकदृष्ठ्या दुर्बल असल्यानेच राजकीय पक्षांनी निवडणूकीत डावलेले असल्याची सल त्यांच्या मनात असल्याने सुरवातीच्या काळात निवडणूक लढवायची की नाही यावर चिंतन करू लागले. मात्र सत्य परेशान हो सकता है पराजित नही असे जनतेच्या त्यांच्या समर्थकांनी सांगीतले.जनतेचा रेटा एवठा मोठा होता की त्यांचे त्यासमोर काहीही चालले नाही .अखेर सरते शेवटी पवार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेवून आजपर्यंतच्या केलेल्या सर्वसामान्यांच्या कामाच्या जिवावर व विस्वासावर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
बलाढ्य शक्तीशी लढत असताना त्यानी आपण प्रभागातील लोंकांची कोणकोणती कामे केली ती घरोघरी जावून सांगून कामाच्या जिवावर मते मागू लागले.त्यांनी आजपर्यंत केलीली सामाजीक कामे म्हणजे इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेअंतर्गत अनेक वृध्दांना मासिक अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेकांना लाभ मिळवून दिला.श्रावण बाळ योजनेअंतर्गत अननेकास लाभ मिळवून दिला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत १२७ नागरिकांना शौचालयाचा लाभ मिळवून दिला.
प्रशासनाच्या मदतीने प्रभागात आधार कार्डचा ३ वेळा कॅम्प आयोजीत केला आणी लोकांना सरकारी कार्यालयात, अगर खाजगी स्ठेशनवर वारंवार हेलपाटे मारावे लागत होते त्यापासुन वाचवले. याबरोबरच संपूर्ण प्रभागातील नागरिकांचे मतदान कार्ड नोंदणी केली. विकलांग मुलांसाठी सरकारी लाभ मिळवून दीला., गटई कामगारांना समाजकल्याण विभागामार्फत लोखंडी पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करुन दिले. चर्मकार बांधवांना नगरपालिकेमार्फत जागा उपलब्ध करुन दिल्या अशा विवीध प्रकारची कामे त्यांनी आजपर्यंत केली. त्यांनी प्रभागातील आधी कामे केली मग ते लोकांना सांगत आहेत.
यापुढेही आपण कायम लोकांच्या सेवेत राहणार असून पुढे आपण काय कामे करणार आहोत तेही सागीतली. यापुढे प्रभागात लहान मुलांसाठी वालोद्यान तयार करण्याचा मानस आहे.तर लेंगरे वस्ती, चौधरी वस्ती, कडे जाणारा जुना गेटजवळील रस्ता चालु करणार असल्याचा त्यांचा मानस आहे. याबरोबरच रेल्वे हॉस्पीटल मधुन शिवप्रतिष्ठानकडे जाणारा जुना रस्ताही चालु करण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहेत.
प्रभागातील सर्व रस्ते काँक्रीटीकरण करणार, गवळी वस्ती येथे श्री शिवसमर्थ प्रवेशद्वार नावाने कमान करणार असून त्यासाठी मोठ्या ताकतीने पाठपुरावा करणार असल्याचे त्यानी बोलून दाखवले. लेंगरे वस्ती येथे श्री. संत वाळुमामा यांच्या नावाचे प्रवेशद्वार करणार .जेष्ठ नागरीकांसठी विरंगुळा केंद्र उभारणार,केंद्र सरकारच्या जलधर योजनेतुन पिण्याच्या पाण्यासाठी अॅक्वा प्लॅट बसवणार अशा पध्दतीने प्रभागाचा सर्वागीण विकास करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.


























