धाराशिव – माझा कनिष्ठ चिरंजीव प्रतिक व सून प्राशी यांच्या मंगलपरिणयाचा प्रथम वर्धापन दिन सह्याद्री अनाथ बालगृह धाराशीव येथे दिनांक २३/०२/२०२६ रोजी बालकांना खाऊच्या स्वरूपात मदत देऊन साजरा करण्यात आला.त्यावेळी आयु राजेंद्र धावारे, राजश्री धावारे, रोहित धावारे,प्रतिक्षा धावारे,गौरव धावारे, रुपाली धावारे, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी अशोकराव बनसोडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ, सेवानिवृत्त शिक्षक बलभीम कांबळे, पंकज कुलकर्णी,संकेत गायकवाड, डॉ दिग्गज दापके, डॉ फेरोज पल्ला,किरण मैडम उपस्थित होते.
“अंकुर शिशूगृह “ सह्याद्री हॉस्पिटल येथे लग्नाचा वाढदिवस अनोखा पद्धतीने साजरा करण्यात आला .
धाराशिव येथील प्राशी प्रतिक धावारे यांनी आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त “अंकुर शिशूगृह “ सह्याद्री हॉस्पिटल येथे लग्नाचा वाढदिवस ० ते ६ वयोगटातील अनाथ बालकां सोबत साजरा केला.
यावेळी बालकांना लागणारे विविध प्रकारचे उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ मा. दिग्गज दापके देशमुख सर बोलताना म्हणाले की अशा नवीन पिढीतील युवकांनी समाजात आदर्श निर्माण होईल असे काम केले पाहिजे. यावेळी राजेंद् धावारे सर , अबदूल लतिफ साहेब ( रुग्ण कल्याण समिती सदस्य ) ,अशोक बनसोडे साहेब ( माजी जिल्हा क्रीडा अधिकारी ), बलभिम कांबळे साहेब आणि अंकुर शिशूगृह येथील कर्मचारी व सेविका तसेच धावारे परिवारातील सर्व सदस्य , मित्र परिवार उपस्थित होते.


























