लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून नियोजन केले जात आहे. राजकीय पक्षही निवडणूक तारखांच्या घोषणांची वाट पाहत आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी विविध राज्यांचे दौरे करत आहेत. हे दौरे 12 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे.
त्यानंतर 13 मार्चनंतर कधीही लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक सात ते आठ टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
निवडणूक आयोगाची तयारी सुरु असताना राजकीय पक्ष कामाला लागले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. तर महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.