हदगाव / नांदेड – हदगाव तालुक्यातील मौ. चिंचगव्हाण येथील ग्रामसेवक नामदेव निर्मळ यांनी गोठ्याच्या योजनेखाली लाभार्थी ज्ञानेश्वर हुंबे यांची फसवणूक करून पंधरा हजार रुपयांची मागणी केली असता ती देऊन सुद्धा अद्यापही या योजनेचा लाभ तर दिलाच नाही अनेक तक्रारी अर्ज, आत्मदहनाचा इशारा देऊन सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने या ग्रामसेवकास पाठिंबा कोणाचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे लाभार्थी यांनी स्मरणपत्र देऊन गट विकास अधिकारी हदगाव यांच्याकडे या मुजोर व भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मौ. चिंचगव्हाण येथील ग्रामसेवक नामदेव निर्मळ यांनी गोठ्याच्या लाभार्थी ज्ञानेश्वर हुंबे यांची फसवणूक करत १५००० रुपये रक्कम उकळले या व्यतिरिक्त घराची पट्टीची पूर्ण रक्कम दिल्यानंतर सुद्धा अद्यापि ही त्याची पावती दिली नाही असा आरोप देखील यावेळेस करण्यात आला याची वेळोवेळी लाभार्थी यांनी वरिष्ठांना तोंडी, लेखी तक्रार देऊन सुद्धा या मुजोर, भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची पाठराखण का केली जात आहे.
या उपरही लाभार्थी यांनी आत्मदहनाचा इशारा देताच आपण समजूत काढून मला न्याय देण्याचा शब्द दिल्यामुळे मला आत्मदहनापासून प्रवृत्त केले होते पण अद्यापही मला न्याय भेटला नाही तरी गट विकास अधिकारी यांनी स्मरण पत्र देऊन या गंभीर समस्ये कडे लाभार्थी यांनी लक्ष वेधले.
























