पिलीव – पिलीव हे माळशिरस तालुक्यातील सातारा – सोलापूर महामार्गावरील मुख्य बाजारपेठ असणारे गाव .याठिकाणी राञ दिवस कायम रहदारी व वर्दळ असते.
बसस्थानकावर तर प्रचंड वर्दळ असते.परंतु याठिकाणीचे काम संबधीत ठेकेदाराने पाच – सहा वर्षांपासून रखडविले आहे.याठिकाणी ना डिवहायडर ना वाहतुक नियंत्रण रेषा ,ना बसस्थानक असुन लाईट अशी विदारक चित्र असताना याठिकाणी खरेतर चारचाकी वाहन, दुचाकी वाहन व विक्रेते यामुळे या मुख्य चौकात सर्व सामान्यांना अक्षरश वावरणे सुद्धा अवघड झाले आहे.अतिक्रमणाचा अक्षरश याठिकाणी विळखाच आहे .
याठिकाणी बसस्थानकापासुन जवळच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आहे.याठिकाणी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात जवळपास एक हजार विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा या अतिक्रमणाचा प्रचंड ञास सहन करावा लागत आहे.बचेरी चौकापासुनच गाडीवालयांनी केलेले अतिक्रमण तसेच अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांमुळे बसस्थानकावर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ् यांना याठिकाणी वावरणे मुश्कील झाले .यातुन पोलीस चौकी सुद्धा सुटेना चौकीसमोरच नागरिक अस्ताव्यस्त वाहने लावलेली असतात.
खरेतर याला शिस्त लावणे आवश्यक आहे पण याला शिस्त कोण लावणार हा खरा विषय आहे. सदरच्या बेशिस्ताना नियमाचा बडगा दाखवून शिस्त लावणे आवश्यक आहे .पण पिलीव बसस्थानकावरील मुख्य चौक मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न सर्व सामान्य विचारीत आहेत.
फोटो _ पिलीव येथील बसस्थानकावरील मुख्य चौकातील विदारक चित्र.


















