सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक हॉटेल ग्रँड करकंब ता.पंढरपूर येथे आमदार अभिजीत पाटील,भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
व्यासपीठावर आ. अभिजीत पाटील, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, शिवसेनाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ धोत्रे, काँग्रेस पक्षाचे निरीक्षक जावेद काझी उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक, संयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी केले.
🔸आपल्या प्रास्ताविकात दिलीप धोत्रे म्हणाले की सत्ताधारी पक्षाला लोक कंटाळले आहेत येणारी निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता काम करावे. वोट चोरीचा मुद्दा घराघरापर्यंत पोहचवावा. आणि एक नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
🔶काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार म्हणाले की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निष्ठावंत,एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट देणार असून तो विश्वासू आणि पक्षनिष्ठ असला पाहिजे. निवडून आल्यावर दगा- फटका करणार नसावा. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना वरिष्ठाच्या मान्यतेनुसार संधी देणार असल्याचे सांगितले.
🔸शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे म्हणाले की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच दिवस रात्र एक करून महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे काम लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत केले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही शिवसेना आघाडीची भूमिका समर्थपणे निभावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
🔶राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार कोणीही असू द्या.तो आपल्या पक्षाचा, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असे समजून सर्वांनी तन-मन-धनाने व एकजुटीने काम केल्यास नक्कीच सत्ता परिवर्तन होईल.
🔸भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत आपल्या मार्गदर्शन म्हणाले महाविकास आघाडीला नेहमीच मदत करीतआलो आहे. याही पुढे सत्ता परिवर्तनासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत. ज्यांना निवडणुकीस उभे राहायचे आहे. त्यांनी आतापासून गावा-गावात जाऊन लोकांशी संपर्क साधावा.
🔸माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील म्हणाले की उमेदवार हा जन माणसात मिसळणारा, लोकांची कामे करणारा, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असावा. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी गण- गट व प्रभागात जाऊन मतदार यादीची पडताळणी करावी. मतदारांच्या गाठीभेटी घ्याव्यात. विरोधकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे. काम करावे.
🔸महाविकास आघाडीच्या बैठकीचे सूत्रसंचालन पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपुर यांनी केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक जावेद काझी, तालुकाध्यक्ष संदीप पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनंजय पवार,जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर, अरुण भाऊ कोळी,हनुमंतराव मोरे,राहूल पाटील,सुहास भाळवणकर, समीर कोळी, अमर सूर्यवंशी, राहुल पाटील,नागनाथ आढळराव,बाळासाहेब मगर, राजेंद्र मोरे,मामा फलटणकर,संदिप शिंदे, राजाभाऊ उराडे, प्रा.अशोक डोळ, बाळासाहेब आसबे, नितिन शिंदे, शिवाजी धोत्रे,आदी काँग्रेस पदाधिकारी सह राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















