आज आणि उद्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तला आहे. राज्यात आज आणि उद्या राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. आज एखाद्या तालुक्यात पाऊस झाला तर उद्या दुसऱ्या एखाद्या तालुक्यात पाऊस पडेल असं डख यांनी सांगितलं आहे.
15 जून ते 17 जून या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पाऊस विश्रांती घेणार
दरम्यान, पंजाबराव डख यांनी वर्तवेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस विश्रांती घेणार आहे. 15 जून ते 17 जून याकाळा काही भागांमध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा खंड पडण्याची शक्यता नसल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. विदर्भात तब्बल 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. या कालावधीत ओढे नाले भरुन वाहतील असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात येत्या पाच-सहा दिवसांपर्यंत पेरणी योग्य पाऊस पडू शकतो असंही डखांनी सांगितलं आहे.
विदर्भात 22 जून पर्यंत पाऊस पडणार
पंजाबराव डख यांनी सांगिल्याप्रमाणे, आज आणि उद्या राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, खानदेश विभागातील धुळे, जळगाव मराठवाडा विभागातील परभणी, जालना, नांदेड, लातूर, बीड हिंगोली या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात 22 जून पर्यंत चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.
चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद
सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर काही भागात शेती पिकांना देखील टका बसला होता. हा फटका वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं बसला होता. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात केळीच्या बागांचे मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. दरम्यान, यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस, होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.