सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज सकाळी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये सन 2017 च्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत एकूण 34 जागांवर आरक्षण बदल झाले आहे. तर दहा प्रभाग पूर्णपणे जैसे थे आहेत. यामुळे संबंधित नगरसेवकांना इतर जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. एकूण दहा प्रभाग आरक्षण जैसे थे आहे. तर दोन प्रभागांमध्ये संपूर्ण बदल झाला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आरक्षण बदलाचा हा फटका काही जणांना बसला आहे.
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 102 जागांकरिता आज आरक्षण सोडत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एकूण 26 प्रभागांपैकी 24 प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. तर दोन प्रभागात प्रत्येकी तीन सदस्य राहणार आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत पाहता बदल झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यामध्ये एकूण 34 जागांवर आरक्षणामध्ये बदल झाला आहे. यामुळे प्रस्थापितांना याचा निश्चितच फटका बसणार आहे. तर काही जणांना तर काहीजणांना त्याच प्रभागातील सर्वसाधारण आरक्षण जागेची चाचपणी करावी लागणार आहे.
एकूण दहा प्रभाग हे जैसे थे राहिले आहेत. त्यामुळे या दहा प्रभागातील 40 जागांवरील माजी नगरसेवकांना सेफ झोन असल्याचे दिसते. तर 14 प्रभागातील प्रत्येकी दोन जागी जैसे ते आरक्षण पडले आहे. अशा पद्धतीने 68 जागांवरील माजी सदस्य यांना कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याच प्रभागातून ते निवडणूक लढवू शकतील असे चित्र आहे. प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मधील प्रत्येकी तीन जागांवरील आरक्षणात संपूर्ण बदल झाला आहे.
या प्रभागात आहे आरक्षण जैसे थे
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या सोडत आरक्षणामध्ये दहा प्रभागांमध्ये सर्व आरक्षण जैसे थे आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक एक, दोन, चार, सात, नऊ, दहा, बारा, पंधरा, सतरा, अठरा या प्रभागांचा समावेश आहे. तर 14 प्रभागातील दोन जागांवर आरक्षण बदल झाला नसून यामध्ये प्रभाग क्रमांक तीन, प्रभाग पाच, प्रभाग सहा , प्रभाग आठ, प्रभाग 11, प्रभाग 13, प्रभाग 14, प्रभाग 16, प्रभाग 19, प्रभाग 20, 21, 22, 23, 24 हे आहेत.
34 जागी आरक्षण बदल ;
हे आहेत माजी नगरसेवक
नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये 34 जागांच्या आरक्षणामध्ये बदल झाला आहे. त्यातील माजी नगरसेवक आणि कंसात बदल झालेले सध्याचे प्रभाग आरक्षण असे –
सूर्यकांत पाटील- प्रभाग तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , अंबिका पाटील- प्रभाग तीन क सर्वसाधारण, स्वाती आवळे- प्रभाग पाच अ अनुसूचित जाती, गणेश पुजारी- प्रभाग पाच ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मनोज शेजवाल – प्रभाग 6 अ अनुसूचित जाती महिला, ज्योती खटके- प्रभाग 6 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, अमर पुदाले- प्रभाग आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सोनाली मुटकीरी – प्रभाग आठ क सर्वसाधारण, राजकुमार हंचाटे- प्रभाग 11 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रिक्त – प्रभाग 11 क, (दिवंगत) सुनील कामाठी निवडून आले होते (प्रभाग 13 अ अनुसूचित जाती महिला), प्रतिभा मुद्गल- प्रभाग क्रमांक 13 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, वहिदाबानो शेख- प्रभाग 14 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, तोफिक हत्तुरे – प्रभाग क्रमांक 14 क सर्वसाधारण महिला, मीनाक्षी कंपली – प्रभाग क्रमांक 16 अ अनुसूचित जाती, नरसिंग कोळी – प्रभाग 16 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, श्रीनिवास करली- प्रभाग 19 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अनिता कोंडी- प्रभाग क्रमांक 19 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रवीण निकाळजे- प्रभाग 20 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुराधा काटकर – प्रभाग वीस ब सर्वसाधारण महिला, तोफिक शेख – 21 अ अनुसूचित जाती महिला, तसलीम शेख- प्रभाग क्रमांक 21 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, पुनम बनसोडे- प्रभाग क्रमांक 22 अ अनुसूचित जाती, किसन जाधव – प्रभाग 22 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सुनिता रोटे – प्रभाग क्रमांक 23 अ अनुसूचित जाती, लक्ष्मण जाधव – प्रभाग 23 क सर्वसाधारण महिला, संगीता जाधव- प्रभाग 24 अ अनुसूचित जाती, माजी उपमहापौर राजेश काळे – प्रभाग 24 ब अनुसूचित जमाती महिला, सुभाष शेजवाल- प्रभाग 25 अ अनुसूचित जाती महिला, मनीषा हूच्चे- प्रभाग क्रमांक 25 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, वैभव हत्तुरे- प्रभाग क्रमांक 25 क सर्वसाधारण महिला, शिवलिंग कांबळे- प्रभाग क्रमांक 26 अ अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 26 ब अनुसूचित जमाती, प्रिया माने- प्रभाग क्रमांक 26 क सर्वसाधारण आदी.




















