सोलापूर : पतीबरोबर झालेल्या भांउणाचा राग मनात धरून पत्नीने राहत्या घरात ओढणीने दरवाज्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री उत्तर सदर बझार येथे घडला.
राधा सनी आंबेवाले (वय 30) असे महिलेचे नाव आहे. राधा हिचे तिच्या पतीबरोबर घरगुती कारणातून भांडण झाले. यानंतर संतापलेल्या राधा या विवाहितेने पहाटे 3.30 च्या सुमारास राहत्या घराच्या दरवाजाला ओढणी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच, त्यांनी राधा यांना गळफासातून सोडविले. त्यानंतर रवि चौधरी यांनी उपचारास दाखल केले, परंतु शुध्दीवर असलेल्या विवाहितेला बोलता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.