तभा फ्लॅश न्यूज/लोहा : दोन तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावस झाला नदी नाल्याना पूर आला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जनावरे दगावली पुरामुळे वाहतुक ठप्प झाली शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले या पार्श्वभूमीवर
तहसील कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील पूर परिस्थिती चा आढावा घेतला. तात्काळ पंचनामे करा प्रस्ताव पाठवा, निधीची कमरता भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक करत तालुका प्रशासनाला सूचना दिल्या
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील अतिवृष्टी व उदभवलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा आढावा लोहा तहसील कार्यालयात गुरुवारी (२१ ऑगस्ट) दुपारी एक वाजता घेतला
.बैठकीस माणिकराव मुकदम माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहन पवार, जि.प. उपअभियंता शिवाजी राठोड, नायब तहसीलदार मोकले,
माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, माजी सभापती आनंदराव शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, खुशाल पाटील,पांगरिकर दत्ता वाले, करिम शेख,वन विभागाचे वनपाल ज्ञानेश्वर हाकदळे , दिघे, यांच्यासह पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, फॉरेस्ट आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आमदार चिखलीकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला तालुक्यातील सहाही मंडळात अतिवृष्टी झाली आहे शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावेत. पूरामुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करा . या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.”असा विश्वास शेतकरी व संबंधित विभागास दिला
आरोग्य विभागाकडे विशेषतः लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, “पूरग्रस्त भागात औषधांची कमतरता भासू नये. जर तुटवडा असेल तर तातडीने पत्र सादर करावे. आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी स्वतः संपर्क साधणार आहे आरोग्य यंत्रणा सतर्क असली पाहिजे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी या विभागाला दिला मतदारसंघातील कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही,” असे ठामपणे सांगितले
यावेळी उपस्थित पदाधिकारी शेतकरी यांनी काही महत्वाच्या सुचना केल्या