सोलापूर – होटगी येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंचूरच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ करत उज्वल यश संपादन केले खो-खो लहान गट मुलांमध्ये बलाढ्य अशा संघांना पराभूत करत विजेतेपद पटकावले.
या संघाचे सोलापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाले आहे सर्व यशस्वी खेळाडूंचे गटशिक्षणाकडे जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरु बाळा सनके, मंद्रूप बीट विस्तार अधिकारी कलबुर्गी, भंडारकवठे केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव कमळे, सरपंच बाळासाहेब पाटील, भीमाशंकर फुलारी, मल्लिकार्जुन झाडबुके व ग्रामस्थांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक तुळशीराम शेत संधी, शांतप्पा ळोळी अशोक साळुंखे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले

























