सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग हद्दीतील सिद्धेश्वर चौक, हाणमगाव रोड येथे सरत्या वर्षी म्हणजेच ३१ डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी एका तरुणाचा दगडाने व धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घडली. घटनेची माहिती मिळताच मित्र व नातेवाईकांची गर्दी सिव्हिल हॉस्पिटल येथे झाली होती.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव लक्ष्मण वसंत वाघमारे वय ३२, राहणार सिद्धेश्वर मंदिर जवळ, वळसंग, सोलापूर असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याचा खून घरा शेजारी राहणाऱ्या रविकुमार भीमाशंकर फुटके यांनी केल्याची माहिती मिळत आहे. मयत तरुण हा व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्मण वाघमारे यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती मृत्य झाल्याचे घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, मयत तरुणाच्या चेहऱ्यावर पूर्णपणे जखमा करण्यात आल्या असून, पोटावरही गंभीर जखमा आहेत. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण वळसंग परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत.
चौकट
भर चौकात झाला खून
लक्ष्मणचा भर चौकात खून झाला. खूनकरांना हा त्यांचा लांबचा नातेवाईक आहे. लक्ष्मण चा स्वभाव हा मनमिळावू होता. चौकात जाऊन लक्ष्मण बसला होता. परत जाताना दोघांमध्ये वाद झाला, लगेचच त्याने वार करून त्याचा खून केला.
– सागर राठोड, मयताचा मित्र
चौकट
माझ्या सख्ख्या भावाचा ज्याने खून केला तो नारोडे दारुडी आणि नशेडी होता. लक्ष्मण चे लग्न झाले होते. तो एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. ज्याने हा खून केलेला आहे त्या आरोपीवर कडक कारवाई करावी.
– राम वाघमारे, मयताचा भाऊ

























