अक्कलकोट – दहावी परीक्षेला अनन्य साधारण महत्व आहे दहावी चे वर्ष आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी व नवीन दिशा देणारे वर्ष आहे . हे ओळखून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा . उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी . माणिकराव देशमुख यांनी केले .
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर संचलित श्री हनुमान विद्यामंदिर, या संकुलात आयोजित इयत्ता 10 वी परीक्षार्थींचे शुभचिंतन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते .
प्रारंभी संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुंखे , संस्थांमाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश मदभावी, गोधराज भक्ती मंडळाचे अध्यक्ष सुनीलभाऊ देशमुख, दीपक पाटील मुख्याध्यापक . आप्पासाहेब हत्तुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चेंडके, काशिनाथ कोणदे , आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माणिकराव देशमुख म्हणाले, जीवनात आई – वडील व गुरू हे तीनच असे महत्वपूर्ण योगदान व स्थान आहेत की आपले आयुष्य बदलू शकतात दररोज अभ्यास व पारिवारिक सेवेबरोबर सामाजिक सेवा साधण्यासाठी परिश्रम घ्यावे या विद्यालयातील सर्वच शिक्षक बांधवांनी अनेक आव्हान स्वीकारून यशस्वी वाटचाल सुरु ठेवली . विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन केले या सर्व परिश्रमाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपले लक्ष गाठावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक आप्पासाहेब हत्तुरे काशिनाथ कोणद, दीपक पाटील, यांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या..
सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी सात हजार किमतीचे माईक सेट विद्यालयास भेट देऊन व संपूर्ण आर्थिक भार उचलून एक आगळा – वेगळा संदेश दिला..
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक हत्तुरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केल. .
यावेळी विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन जेष्ठ शिक्षिका एन.एस राऊत यांनी केले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गेल्या वर्ष भरातील शैक्षणिक कार्याचा आढावा व आगामी वाटचाली संदर्भात पर्यवेक्षक अमोल भावसार यांनी प्रास्ताविकेत आपले विचार स्पष्ट केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश मदभावी, प्रगतशील शेतकरी आप्पाराव काळे, . सुनिलभाऊ देशमुख यांच्या आर्थिक सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत कुंभार यांनी केले तर सुप्रिया जामगे यांनी उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक अमोल भावसार, जेष्ठ शिक्षक .श्रेयस पाटील,.सुप्रिया जामगे, तृप्ती रूपनुरे, सेवक नागनाथ कोळी,चाबुकस्वार मामा व सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी , मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केले
























