सोलापूर – जनविकास क्रांतीसेनेच्या आयोजित निर्धार मेळाव्यात, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दररोज पाणी देण्याचा निर्धार जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरीयांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
जनविकास क्रांतिसेनेच्या वतीने 19 नोव्हेंबर 2025 रोजी निर्धार मेळावा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड. संतोष न्हावकर ॲड. शरद पाटील, ॲड. विक्रम कसबे व डॉ. राजेश फडकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांचे व उपस्थित नागरिक बंधू भगिनींचे स्वागत प्रा श्रीशैल वाघमोडे यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. निर्धार मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले.
कारमपुरी पुढे म्हणाले की, सोलापूरच्या विकासाबाबत आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रयत्न केला नाही. त्यामुळे सोलापूरची अवस्था अत्यंत विकास शून्य झाली आहे. सर्व सोलापूरकरांनी आशीर्वाद व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
सदर निर्धार मेळाव्यात ॲड. संतोष न्हावकर, ॲड शरद पाटील, ॲड विक्रम कसबे, यांनी जनविकास क्रांतीसेनेच्या कार्याला शुभेच्छा देऊन, जनविकास क्रांतीसेना ही सोलापूर शहर व जिल्ह्यात क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जनविकास क्रांती सेनेचे उपाध्यक्ष मंगेश श्रीखंडे, सचिव ॲड. मुनिनाथ कारमपुरी, खजिनदार विठ्ठल कुराडकर, सदस्य श्रीनिवास चिलवेरी, सदस्य रेखा आडकी, सदस्य, प्रशांत येमुल, अंगद जाधव, प्रसाद जगताप, स्वाती शिंदे, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, सोहेल शेख, सिद्धाराम दुलंगे, राधिका मीठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, पद्मा गुंडला आदी उपस्थित होते.



















