पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे 1926 ह्या वर्षी बांधण्यात आलेले विश्रामगृह सध्या शेवटची घटका मोजत आहे .जवळपास नव्वद वर्षाच्या ह्या विश्रामगृहाचे बांधकाम 1926 ह्या वर्षी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे जिल्ह्य अधिकारी यांच्या देखभालीखाली बांधण्यात आले होते.
सध्या माञ याची चांगलीच दुरावस्था झाली होती .हे ऐतिहासिक ब्रिटिश कालीन विश्रामगृहावर खरेतर पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गागणापुर, कोल्हापूर, गोंदावले या तीर्थ क्षेत्राकडे जाणारे भाविक भक्त असतील किंवा ह्या महामार्गावरुन जाणारे राजकीय किंवा इतर क्षेत्रातील मान्यवरांचा याठिकाणी कायमच वावर असतो. पण सध्याची याची अवस्था बिकट आहे.
याबाबतीत या अगोदरच्या लोकप्रतिनिधींकडून याबाबतीत दुरूस्ती असो किंवा इतर कामासाठी निधी उपलब्ध केला नाही.माजी आमदार राम सातपुते यांनी याचे महत्त्व जाणले व याठिकाणी सुसज्ज असे नवीन विश्रामगृह बांधण्यासाठी साडे तिन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असुन प्रत्यक्ष या कामाची सुरूवात झाली आहे .
याठिकाणी ऐतिहासिक ब्रिटिश कालीन विश्रामगृह तसेच ठेवुन नवीन विश्रामगृह याठिकाणी बांधण्यात येणार आहे .या कामाची नुकतीच माजी आमदार राम सातपुते यांनी पाहणी करीत दर्जेदार काम करण्याच्या सुचना यावेळेस त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.यामुळे पिलीवच्या वैभवात भर पडणार आहे.
पिलीव येथील नवीन विश्रामगृहाची पाहणी करताना माजी आमदार राम सातपुते .






















