देगलूर / नांदेड : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय काँग्रेस पक्षात कुरेशी बिरादरी परिवारातील असंख्य तरुण (२१ नोव्हेंबर) शुक्रवारी प्रवेश केले आहे. या प्रवेशाने भारतीय काँग्रेस पक्षाचे हात अधीक बळकट झाले आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार आणि माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे पक्षप्रवेश होत आहेत. शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी देगलूर शहरातील कुरेशी बिरादार परिवारातील असंख्य तरुणांनी पक्ष प्रवेश केल्याने आगामी निवडणुकीत पक्षाला चांगलीच ताकद मिळणार आहे. यावेळी शेखर अरबाज, शेख अखिल, इफ्तेखर सय्यद, शेख महबूब, शेख शोएब, शेख सोहेल शेख अल्लाह, शेख साहिल, शेख रिहान, शेख इमरान, शेख असलम, शेख सोहेल शकीलसाब यांच्या अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे.
देगलूर शहरात प्रथमच कुरेशी बिरादरी परिवारातील इलियास दौलताबादी यांना नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत कोणत्याही पक्षाने केरेशी बिरादरी परीवाराला उमेदवारी देण्याचे धाडस केले नाही केवळ वापरण्याचे काम केले आहे. परंतु काँग्रेस पक्षाने उमेदवारी देत या समाजाचा सन्मान केल्याचे सांगण्यात येते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार म्हणाले की, आपल्या सुखदुःखात कोणत्या लोकांनी साथ दिली आहे. आपल्या शहरात विकासात्मक कामे आम्ही केले आहे. आमच्या पक्षाची भूमिका सर्वसामान्य माणसाच्या हिताची आहे. आपण ज्या विश्वासाने काँग्रेस पक्षात प्रवेश केलात त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, असे ते सांगितले. तर माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा चांगलाच समाचार घेतला. निलमावार भाषणात म्हणाले की, जनतेला सर्वकाही कळते. कोण कसे वागते ते त्यांना चांगले माहीत आहे. येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. देगलूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वासही निलमवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान पक्षप्रवेश करण्यापूर्वी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर कुरेशी बिरादरी परिवारातील तरुणांना पक्षप्रवेश करवून घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन पुंडलिक टोके यांनी केले तर आभार व्यंकट रोयलावार यांनी मांडले. तसेच मुफ्ती वाजीद साब, मौलाना इरफान दौलताबादी, इलियास दौलताबादी आदीं मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहण्याचे आणि विजय खेचून आणण्याचे निश्चय केल्याचे सांगण्यात येते.
यावेळी धर्मगुरू मुक्ती वाजिद साब, मौलाना इरफान दौलताबादी, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेठवार, माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, लक्ष्मण कंधारकर हाफिज खाॅं पठाण, संजय जोशी, यादव गोरलावार, चंदन मंडलेवार, संगम बैलके, चैतन्य रोयलावार, व्यंकट रोयलावार, इलियास दौलतापदी, अख्तर पटेल, शिवाजी रोयलावार, आजिज कुरेशी, मुन्ना देसाई भायेगावकर, शोएब पटेल, दिलीप माळेगावकर, बालराज माळेगावकर, नागेश गुडलवार, नाविद अंजूम आदींची उपस्थिती होती.



















