सोलापूर : घरात झोपलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना मोहोळ तालुकयातील डिकसळ येथे गुरुवारी रात्री 11.30 वाजता घडला.
मंगल नारायण थिटे (वय 60, रा. डिकसळ ता मोहोळ) असे महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास मंगल या डिकसळ येथील त्यांच्या राहत्या घरी झेापी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डाव्या पायाला सापाने दंश केला. त्यानंतर मध्यरात्री 1.30 वाजता मुलगा धनाजी याने उपचारास दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्या मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.