तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सात वर्षापासून घरात काम करीत होती. विश्वासू असल्याने ती चोरी करणार नाही,असे वाटले, मात्र घरात काम करणाऱ्या महिलेने घरातून दिड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे.
याप्रकरणी महिलेवर जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी महिला घरी कामास आहेत. तरी त्या महिलेने राहत्या घरामधील बेडरुमधील ड्रॉवरवर दिड तोळे हिराचे पेन्डाल असलेले सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. त्यानंतर तीचे दैनंदिन काम सुरु होते. त्या महिलेस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, तिच्याकडे कसून चौकशी केली असता तीने चोरी केल्याची कबुली दिली.
मात्र ते मंगळसूत्र हरवले असल्याचे सांगितले. त्या महिलेस न्यायलयात हजर केले जाणार आहे.पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या महिलेवर गुन्हा नोंद केला आहे.