वेळापूर – महिलांनी, मुलींनी आपल्या जीवनामध्ये ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास निश्चत यश मिळेल व परिस्थिती बदलण्यास मोठी मदत होईल असे प्रतिपादन स्त्री रोग व वंध्यत्व चिकित्सा तज्ञ डॉ. सौ रेवती राणे यांनी केले. त्या वेळापूर जि प शाळा मुली येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वेळापूर जि प सदस्या सौ मीनाक्षीताई सरतापे, डॉ. शुभांगीताई माने देशमुख, गटशिक्षणाधिकारी पं. स. माळशिरस सुषमा महामुनी, ग्रामपंचायत सदस्य डॉ. स्नेहल जानकर, डॉ. सुप्रिया हेगडे, डॉ. रसिका खिस्ते, विद्या गायकवाड, प्रियंका आडत, सीमा खाडे, अनिता बनसोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष करिश्मा मुलाणी, मनीषा भानवसे, सुवर्णा चव्हाण, यांच्यासह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण घाडगे यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. रेवती राणे म्हणाल्या की आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे़ शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा राजकारण, व्यवसाय आणि कला यासारख्या क्षेत्रात महिलांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. स्त्रीशक्ती ही केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे.असे सांगुन त्या पूढे म्हणाल्या की महिलांनी आपल्या आहार व आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही सांगितले. यावेळी कर्करोग ही भारतीय महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून यापासून बचाव कसा करायचा याचेयही मार्गदर्शन केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, की स्त्री सक्षम असेल तरच देश कणखरपणे उभा राहू शकतो. इतिहासातील समाज सुधारक महिलाचे विविध उदाहरण देऊन महिलांनी देखील अशीच प्रगती करावे असेही सांगितले.
यावेळी तेजश्री भानुसे या विद्यार्थिनींनी जिजाऊंची वेशभूषा करून जिजाऊंच्या कार्य व कर्तुत्वाविषयी भाषण केली .
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर महिलांचे मुली जि प शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या नीता जाधव, अंकिता लोखंडे, अनुराधा काटकर, कल्पना सालपे, अशा गायकवाड, करिष्मा मुलाणी, इत्यादी महिलांना बक्षीसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी, शिक्षक जीवन रणनवरे, पांडुरंग कुलकर्णी, नितीन चव्हाण, प्रवीणकुमार पांगे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कविता आवटे यांनी केले तर आभार श्रीमती आसराबाई जैन यांनी मानले.

























