सोलापूर – महिला क्रिकेट संघाने विश्वचशकावर नाव कोरल्याने संपूर्ण भारतात जल्लोष साजरा केला जात आहे. सोलापुरात महिला सामाजिक संघटनांनी एकत्रित येत शहराच्या मुख्य चौकात दिवाळी साजरा केली. महिलांची खरी दिवाळी आत्ता साजरा झाली अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली. 1983 साली कपिल देव कॅप्टन असताना भारताने विश्वचषक जिंकले होते, त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संपूर्ण भारतात एक दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी वॉव फाउंडेशनच्या विद्या लोलगे यांनी केली.
वॉव फाउंडेशन म्हणजेच वर्ड ऑफ वुमन च्या वतीने भारतीय महिलांच्या संघाने प्रथमच वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल पार्क चौक येथे फटाके फोडत, जल्लोष साजरा करून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. नेहमी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वॉव फाउंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येतात. सोलापूर मधेही वॉव फाउंडेशनच्या वतीने चार पुतळा येथे आनंद साजरा केला.
यावेळी वॉव फाउंडेशनच्या सायरा शेख, स्वाती मुकनार, शोभा गायकवाड, मार्था आसादे, लता ढर, माया खरात, कांचन चौगूले, लामकाने, लक्ष्मी पवार, शारदा मुस्ती आदी वॉव फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

















