वेळापूर – २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत लोकविकास मराठी मिडियम स्कूल, वेळापूर येथे महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. विजया चापले यांच्या हस्ते २ मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या.
यानंतर डॉ. सौ. स्नेहल पताळे यांनी उपस्थित महिलांना व विद्यार्थ्यांनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांनी दैनंदिन जीवनात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, संतुलित आहाराचे महत्त्व आणि नियमित तपासणीचे फायदे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या सप्ताहात महिला चर्चा सत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. या सत्रात महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनीही आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमात वातावरण अधिक उत्साही करण्यासाठी मेहंदी स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांना महिलांनी व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सप्ताहामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासोबतच समाजात सकारात्मक संदेश देण्याचे कार्य झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

























