सोलापूर – महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अभियानाच्या वतीने झाडी, तालुका बार्शी येथे नुकताच मार्गदर्शन मेळावा आणि बचत गटाच्या प्रेरिकांची निवड करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचा शुभारंभ आणि मान्यवरांचा सत्कार
सर्वप्रथम, महिलांच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रमेश सांगुळे, उपसरपंच शशिकांत मते,संतोष पालखे तसेच उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार व सन्मान करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
मेळाव्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून झाडी, तालुका बार्शी येथील बचत गटाच्या प्रेरिकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
’उमेद’ अभियानाचे प्रभाग समन्वयक संतोष पालके यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली.
या प्रक्रियेदरम्यान, झाडी, तालुका बार्शी येथील प्रतिक्षा सांगुळे यांची सर्वानुमते प्रेरिका म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी गावचे सरपंच रमेश सांगुळे यांनी महिलांना महिला सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन केले.
तसेच, ‘उमेद’ अभियानाचे समन्वयक संतोष पालके यांनी महिलांना उमेद अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. या अभियानाचे महत्त्व, बचत गटांचे फायदे, आणि महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी हे अभियान कसे उपयोगी ठरू शकते, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती आणि सहभागी सदस्य
हा कार्यक्रम प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख उपस्थिती सरपंच रमेश सांगुळेउ पसरपंच शशिकांत मते ‘उमेद’ अभियानाचे प्रभाग समन्वयक संतोष पालखे एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचच्या आशा चव्हाण, प्रतिक्षा सांगुळे, सरोजा मते, स्वाती मते, अंजू सांगोळे, अश्विनी मते, कोमल वाघमारे, इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आशा चव्हाण यांनी केले.
उपस्थित सर्व मान्यवर आणि महिलांचे आभार प्रदर्शन सरोजा मते यांनी मानले.

























