पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी दर्शन रांगेत पत्राशेड येथे आले होते. त्यावेळी त्यांना दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत मंदिर समितीचा सहअध्यक्ष या नात्याने मंदिर समितीच्या वतीने गहिनीनाथ महाराज औसेकर विनंती केली होती.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी या कामाचा प्रस्ताव तयार करून शासनास तात्काळ सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन, शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यास उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन रूपये १२९.४९ कोटीचा आराखडा राज्य शिखर समिती समोर सादर केला होता. या आराखड्यास शिखर समितीने मंजुरी देऊन दि. ११ ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून १३ कोटीचा निधी वितरीत केला होता. तद्नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विहित प्रक्रिया राबवून इंटरफेस डिझाईन असोसिएटस, पुणे यांना ठेका दिला आहे.
———————-
चौकट : ( आषाढी यात्रेपर्यंत ८० टक्के काम होणार पुर्ण )
लवकरच काम सुरु होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्या आषाढी यात्रेपर्यंत याचे जवळपास ऐंशी टक्के काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली.
———————-
चौकट : ( असा असणार स्कायवॉक )
या स्कायवॉकची लांबी – १०५० मी, रुंदी – २.४ मीटर आणि उंची – ४ मीटर असून तो जमिनीपासून ७ मीटर ऐवढ्या उंचीवर असणार आहे. पत्राशेडपासून पूर्व दरवाजापर्यंत – केवळ Transit साठी असणार आहे, यामध्ये भाविक थांबणार नाहीत. जमिनीपासून ४ मीटर उंचीवर बांधण्यात येणार आहे. भाविकांना विश्रांती म्हणून १०५० मीटर लांबीच्या स्कायवॉकमध्ये तीन विश्रांती क्षेत्रांची तरतूद. आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सहा ठिकाणी जिन्यांची व्यवस्था. चंद्रभागा घाट, श्री राम मंदिर आणि कुंभार घाट असे तीन ठिकाणी प्रसाधनगृहे प्रस्तावित आहेत. पब्लिक अड्रेस सिस्टिम, सिक्युरीटी एरीया, प्रथमोपचार सुविधा, प्रकाश व वायुविजन व्यवस्था, स्ट्रक्चरल स्टील मधील बांधकाम त्यामुळे काम गतीने पुर्ण होणार.
———————-
चौकट : ( पावसाचे पाणी शिरु नये म्हणून ओव्हरहँग छत )
सद्यस्थीतील पायाभूत सुविधांवरचा ताण कमी करण्यासाठी व गतीने स्कायवॉकचे बांधकाम करण्यासाठी स्टील स्ट्रक्चरचा वापर प्रस्तावित करण्यात आला आहे. पावसाचे पाणी शिरण्यापासून रोखण्यासाठी स्कायवॉकचे छत १.५ मीटर ओव्हरहँग प्रस्तावित आहे.
———————-
चौकट : ( आपतकालीन परिस्थितीत सहा ठिकाणांहून वारकऱ्यांना बाहेर काढणे शक्य )
भाग १ दर्शन रांगेसाठी स्कायवॉक (उन्नत मार्ग), १०५० मी.लांब, २ मी रुंद, ३ मी.उंच, मुलभूत सुविधा, ईतर मुलभूत सुविधा. स्टील्ट फ्लोअर ४ मी. उंचीवर बांधण्यात येणार, लीफटस, रॅम्प्स, लॉकर्स, आपतकालीन परिस्थितीत वारकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सहा ठिकाणी स्टेअर केसीस , पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेन पाईप्स, गटर्स व जमीनीला प्रापर उतार.
—————————
चौकट : ( ग्राउंड फ्लोअरवर मेडीकल फॅसिलीटीस )
ग्राउंड फ्लोअर : मेडीकल फॅसिलीटीस – मेल फिमेल वार्ड प्रत्येकी १० बेड्स, सिक्युरीटी एरीया, लॉकर्स, चार मोठया लिफ्ट्स ( १० फुट बाय साडे सहा फुट ) व दोन लहान लिफ्ट्स, अन्नछत्र ८०० चौ. फुट, भोजनालय १५० व्यक्तीकरीता, स्टोअर्स, आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहे, फायर शाफटस.
————————
चौकट : ( एकुण चार मजल्यांचा असणार दर्शनमंडप )
दर्शन मंडप – क्षेत्रफळ – १६१८५ चौमी, स्टील्ट मजला -५८१७ चौमी, तळमजला- ४९२३ चौ मी, पहिला मजला – ४९२३ चौ मी, दुसरा मजला-५२२ चौ मी. प्रत्येक मजल्याचे वैशिष्ठ आणि वारकरी क्षमता : स्टील्ट मजला उंची – ४ मी क्षमता – ६००० भाविक. फस्ट, सेकंड व थर्ड फ्लोअर : एका मजल्यावर २००० वारकरी बसु शकतील असा दर्शन मंडप.
———————
चौकट : ( दर्शन मंडपातील उपलब्ध सुविधा )
आपतकालीन परिस्थितीसाठी दर्शन रांग मधेच काढता येण्याची सोय, प्रत्येक मजल्यावर २४ मेल फिमेल टॉयलेटस, युरीनल्स, वॉश बेसीन्स, सिक्युरीटी एरीया, चार वेगवेगळया ठिकाणी चहा नाश्त्याची सोय, आठ वेगवेगळया ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, पब्लिक अड्रेस सिस्टिम, प्रथमोपचार सुविधा, हिरकणी कक्ष, प्रकाश व वायुविजन व्यवस्था
———————
चौकट : ( प्रत्येक मजल्याचे स्पेसीफिकेशन )
स्टील्ट मजला :- जमिनीच्या सपाटीपासून ४ मीटर उंचीवर, ४- स्ट्रेचर लिफ्टची तरतूद, वारकऱ्यांना सहज बाहेर काढण्यासाठी ४ जिन्यांची व २ रॅम्पची सोय, पूर/वादळाचे पाणी, सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था
पहिला व दुसरा मजला :- पास स्कॅनिंग काउंटर्स संख्या- ३० इतकी, या शिवाय १५०० क्षमतेचे २ सभागृहे, प्रत्येक मजल्यावर (एकूण क्षमता- ६००० व्यक्तींसाठी), तातडीची वैद्यकीय सुविधा, आयसीयू २ बेड, १० सामान्य बेड, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, विद्युत व्यवस्था कक्ष, प्रशासकीय कार्यालय, १० X ६.५० फुट आकाराच्या चार स्ट्रेचर लिफ्ट आणि इतर २ लिफ्ट, अल्पोपहार काऊंटर व किचन, स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी शौचालये.
वारकरी दर्शन मंडप क्षेत्र :- १४६०० चौरस.मी ( जी + ४ मजला), आकार – ७१ मी x ४५ मी ) , क्षमता:- ६००० भाविक, जमीनीपासून ४ मी.उंचीवर प्रकल्प सुविधा – शौचालय, पिण्याचे पाणी, दर्शन सभागृह, अल्पोपहार काऊंटर, तातडीची वैद्यकीय सुविधा, हिरकणी कक्ष, मास एंट्री स्क्रीनिंग सिस्टम, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार सुविधा.
——————–
चौकट : ( प्रकल्प पुर्ण झाल्यावर देणार मंदिर समितीच्या ताब्यात )
या नियोजित प्रकल्पाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीची तसेच इतर अनुषंगीक कामांची जबाबदारी व कार्यान्वयीन यंत्रणा ही श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावर असणार आहे.
























