टेंभुर्णी – पोलीस ठाणे व आर टी ओ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने राजवी ऍग्रो पॉवर प्रा ली साखर कारखाना आलेगाव येथे ट्रॅक्टर, ट्रक चालक मालक व बैलगाडा चालक यांची रस्ता अपघात सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यशाळा घेण्यात आली.
ट्रॅक्टर, ट्रक चालक मालक व बैलगाडा चालक यांना मद्यपान सेवन करून वाहन चालवू नये.वाहनाचा टेपचा आवाज मोठा राहणार नाही. वाहन चालवताना मोबाईल वापरणार नाही.स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन, वाहनाचा इन्शुरन्स ठेवणेबाबत व वाहनाला रिफ्लेक्टर बसवण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या.
या कार्यक्रमा वेळी ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाडीला रिफ्लेक्टर बसवण्यात आले.सदर कार्यशाळे करता 50 ते 60 ट्रॅक्टर, ट्रक चालक-मालक व बैलगाडा चालक हजर होते. सदर कार्यशाळे करता आरटीओ झाडबुके अकलूज व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व स्टाफ व कारखान्याचे शेतकी विभागाचे अधिकारी शिरसागर,सेकुरटी अधिकारी व त्यांचा स्टाफ हजर होता.


















