सोलापूर – विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत प्लंबिंग व्यवसाय संबंधी कार्यशाळा घेण्यात आली. इयत्ता सहावी व सातवी विज्ञान व भूगोल विषयातील विविध व्यवसायाची ओळख या विषयांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत रुपेश म्हंता यांनी प्लंबिंग व्यवसाय संबंधी माहिती दिली.
प्लंबिंग व्यवसायात लागणारे हातोडी , छिन्नी, करवत पट्टी सुलोचन, पाईप, मीटर पट्टी मीटर गेज, मार्किंग दोरी, टेनलिन टेप, ब्रास जोडणी, कोपरे एलबो, टाकी निप्पल, नळ विविध जोडण्या, ग्राइंडर मशीन, ड्रिल मशीन आदी साहित्य दाखवले व प्रत्येक साहित्याचे उपयोग सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच पीव्हीसी व सीपीव्हीसी पाईप कनेक्शन संबंधी संपूर्ण माहिती दिली.आपल्या कामाच्या अनुभवाची व्हिडिओ दाखवले.
या कार्यशाळेत इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गातील दोनशे विद्यार्थ्यांनी माहिती घेतली . कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्लंबिंग व्यवसाय संबंधित पूर्वज्ञान माहिती मिळाली. व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, बजरंग शिरसाट, विशाल खाडे, वैशाली गुजर,हणमंत कुरे आदी उपस्थित होते.

























