मोडनिंब – अरण (ता.माढा) येथिल राऊतवस्ती येथे जागतिक दिव्यांग दिन समता सप्ताह उत्साहात संपन्न झाला.गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत, शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप करण्यात आले. विद्याध्यर्थ्यांची प्रभात फेरी काढून, विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. पालक सुधाकर राऊत यांच्याकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
केंद्रीय विशेष शिक्षिका दिपाली माळी यांच्या विशेष प्रयत्नाने सर्व कार्यक्रम संपन्न झाले. मुख्याध्यापिका पौर्णिमा जगताप, उपशिक्षिका ज्योती कांबळे, शा.व्य.स. अध्यक्ष श्रीकांत शिंदे, विष्णू शिंदे, किशोर राऊत, भागवत राऊत, सागर गायकवाड, पालक व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षिका माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार जगताप यांनी मानले.
















