Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ज्ञान, प्रगतीच्या मराठी भाषेची आराधना करा : विश्वास पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
December 26, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : इंग्रजी भाषा ही जरी जागतिक भाषा असली तरी मराठी ही ज्ञानाची आणि प्रगतीची भाषा आहे. यशाच्या, साफल्याच्या पंढरपुरला घेऊन जाणारी ही भाषा आहे त्यामुळे मराठी भाषेची आराधना करा असे आवाहन ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.

        मनोरमा सोशल फाऊंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी आणि मसाप पश्चिम सोलापूर यांच्यावतीने हाँटेल बालाजी सरोवर येथील सदाशिवराव मोरे सभागृहात आयोजित मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष तथा मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

    दिवसभर चाललेल्या या संमेलनात मुलाखत, परिसंवाद, कवी संमेलन, व्याख्यान, पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, गोवा साहित्य अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, माजी कामगार आयुक्त संभाजीराव काकडे, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष शोभा मोरे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यावेळी उपस्थित होते.

       आपल्या उद्घाटनपर भाषणात विश्वास पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगीतले.मराठी भाषेबाबत जाग्रुत होऊन विचार करण्याची गरज आहे. मुलगा संस्कारी व्हावा असे वाटत असेल तर आईच्या कंठातले शब्द त्याला शिकवा असे ते म्हणाले. २०१२ मध्ये ज्यादिवशी मंत्रालयातील कारकूनाने मराठी शाळांच्या तुकड्यांना परवानगी मिळणार नाही असा अध्यादेश काढला तो दिवस मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी काळा दिवस पाळावा असेही विश्वास पाटील म्हणाले.

      यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, मनोरमा बँकेने किती कोटीच्या ठेवी जमवल्या यापेक्षा अधिक सामान्य माणसांचा विश्वास आणि प्रेम संपादन केले. हीच खरी अनमोल ठेव आहे. मनोरमाने लक्ष्मी आणि सरस्वतीची उपासना केली असून त्यामुळेच साहित्य संमेलन ऐश्वर्यसंपन्न झाले आहे.

      अनिल सामंत यांनी यावेळी मराठी आणि कोकणी भाषेतील साहित्याचा आढावा घेतला. गोमंतकीय साहित्यात अनेकांनी चांगले लेखन केले असूनही आजवर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला नाही याबद्दलची खंत व्यक्त केली.

     डॉ. रविंद्र शोभणे, संभाजीराव काकडे,रामदास फुटाणे,चैतन्य भंडारे,ना.म.शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. त्यांनी मराठी भाषेचा भविष्यकाळ तसेच मनोरमा साहित्य संमेलन याविषयीची आपली मते मांडली. फुटाणे यांनी काही  वात्रटिका सादर करुन संमेलनात खसखस पिकवली.

     कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या भाषणात मराठी का मागे पडत आहे याची कारणे सांगीतली. पुढच्या वर्षी २६ जुलै रोजी विद्यापीठात बहुभाषिक साहित्य परिषद आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.

     प्रारंभी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष शोभा मोरे यांनी स्वागत केले. मनोरमा बँकेने अर्थकारणाबरोबरच सरस्वतीची पुजा मांडली आहे. पंचवीस वर्षापूर्वी मनोरमा संमेलनाला सुरुवात झाली. घरोघरी मराठी पोहोचली पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे.

     संमेलनाच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. साहित्य समाज मनाचा आरसा आहे. समाजातील गुन्हेगारीकरण कमी करण्यासाठी माणसाच्या मनाची मशागत करावी लागेल. मनोरमा परिवार गेली पंचवीस वर्षे हेच काम साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करीत आहे. यामध्ये परिवारातील सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.

     या संमेलनात श्रीकांत मोरे आणि शोभा मोरे यांच्या डायरीतील शेवटचे पान या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी मनोरमा साहित्य संमेलनाचे कार्यवाह संतोष सुरवसे, संयोजक डॉ. सुमित मोरे, ऋचा मोरे, आदिश पायगुडे, जयू भाटकर, राजन लाखे उपस्थित होते.

मराठी भाषा दोन हजार वर्षापूर्वीची : श्रीकांत मोरे 

अध्यक्षीय भाषणात श्रीकांत मोरे म्हणाले, मराठी भाषा दोन हजार वर्षापूर्वीची आहे. बोली भाषेतून ही विकसीत झाली. आता डिजिटल माध्यमांचे युग आहे. या डिजिटल भाषेतील इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे ही भाषा संशोधकांची जबाबदारी आहे. यावेळी मोरे यांनी सोलापुरातील साहित्यीकांनी मराठी साहित्य संम्रुध्द होण्यासाठी दिलेले योगदान विशद केले. अशा दोनशेपेक्षा अधिक साहित्यीकांचा मनोरमा परिवाराने पुरस्कार देऊन सन्मान केला, असेही त्यांनी  सांगीतले. मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलन गोव्यात भरण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

 अंतर्मुख करणाऱ्या सरस कविता

संमेलनाच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यमैफलीत राजन लाखे, अशोक भांडवलकर, माधव पवार, विमल माळी, डॉ. श्रुतीश्री वडकबाळकर, डॉ. मनीषा अतुल, डॉ. राधिका देशमुख, वंदना कुलकर्णी, गोविंद काळे, किरण येले, डॉ.स्मिता पाटील, अँड. सुजाता जाधव, स्वाती कुलकर्णी, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले, कालिदास चवडेकर, बदिउज्जमा बिराजदार, इंद्रजीत घुले, निलोफर फणिबंद, शारदा तालीकोटी, बागेश्री सराफ, विशाखा देशपांडे यांनी कविता सादर केल्या.

—– 

Post Views: 60
Previous Post

वैराग पोलीस ठाण्याची गुन्हेगारी नियंत्रणात मोठी झेप; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडून कौतुक

Next Post

एसीएस हॉस्पिटलतर्फे जनजागृती प्रदर्शनी व प्रात्यक्षिकांचे आयोजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एसीएस हॉस्पिटलतर्फे जनजागृती प्रदर्शनी व प्रात्यक्षिकांचे आयोजन

ताज्या बातम्या

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ !

February 14, 2026

रामदासी कीर्तनकार ह.भ.प.दीपाताई भंडारे यांच्या सुश्राव्य कीर्तनास सातारकर श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026

निकृष्ट रस्ता दुरुस्ती विरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस

February 14, 2026

जिजामाता प्रशालेत निरोप समारंभ कार्यक्रम 2026

February 14, 2026

जल जीवन मिशन योजना हस्तांतरण अंतर्गत जल अर्पण दिवस साजरा करणार

February 14, 2026

सोलापूरमध्ये प्रथमच ‘Educating AI’ संकल्पनेवर टेडेक्ससिंहगड सीओई 2026

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679305

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697