सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे शिवस्मारक सभागृहात झालेल्या भजन स्पर्धेत उपासना, विठाई आणि रेणुका भजनी मंडळाने बाजी मारली. शिवस्मारकतर्फे आयोजित भजन स्पर्धा उत्साहात झाल्या.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक भारतरत्न भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आनंद जोशी, शुभांगी जोशी, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, कोषाध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम – उपासना भजनी मंडळ, द्वितीय – विठाई भजनी मंडळ, तृतीय – रेणुका भजनी मंडळ. उत्तेजनार्थ – संत गोरोबा काका मंडळ, द्वितीय – पाणीवेस भजनी मंडळ. वादक – सुनिल कुलकर्णी (संवादिनी), गजानन पुजारी (तबला). या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास सात हजार रुपये, द्वितीय विजेत्या संघास पाच हजार रुपये तर तृतीय विजेत्या संघास तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी भजनी मंडळास प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि एक हजार ५०० रुपये मानधन देण्यात आले.
याप्रसंगी शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी संचालक प्रा. देवानंद चिलवंत, प्रसाद जिरांकलगीकर, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर आदी उपस्थित होते.
शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने यांनी सूत्रसंचालन केले. शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक तर कोषाध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.



























