बार्शी – दिलीपराव सोपल प्रशाला व दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या दोन्ही शाळेच्या विद्यमाने सोपल प्रशाला बार्शी येथे भव्य बाल आनंद बाजार दिमाखात मंगळवारी संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई (ठोंगे) या संस्थेचे अध्यक्ष मोहनआण्णा ठोंगे, सचिव सौ. तेजस्विनीताई ठोंगे व प्रमुख पाहुणे नानासाहेब चौधरी उपस्थित होते
मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व बाल आनंद बाजारचे फीत कापून उदघाटन झाले.
विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक बौद्धिक गुणांना चालना देऊन विकास व्हावा या दृष्टीने बाल आनंद बाजार भरवला जातो. भविष्यात मुलांना सेल्स मार्केटिंग या व्यवसायाची गुणात्मक बौद्धिक वृद्धी व्हावी म्हणून हा स्तुत्य उपक्रम आहे, असे मत चौधरी सर यांनी मांडले व विध्यार्थ्यांना आनंद बाजारसाठी शुभेच्छा दिल्या. आनंद बाजारमध्ये मुलांनी ७५ स्टॉल मांडून भाजीपाला, स्टेशनरी समान, भेळ, भजी, कटलरी समान, विविध फळे, इमिटेशन ज्वेलरी, किराणा सामान, गृहउपयोगी सामान इत्यादी मांडून त्यांची विक्री केली.
या आनंद बाजारात २१,४५६ रुपयांची उलाढाल झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोखंडे सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत कुंभारे, युवराज जगताप, सुनिल लंगोटे, मंगेश मोरे, सचिन काळे, चंद्रकांत लोखंडे, संतोष ठोंबरे, राहुल ठोंगे, संगीता काळे,अरुणा मठपती, शितल पाटील, ललिता चव्हाण, प्रेरणा कसबे तसेच सेवक संदीप भोरे, श्रीकांत चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
















