लिलावात स्मृतीची बेस प्राइस ५० लाख इतकी होती. मात्र तिच्यावर अंतिम बोली ३ कोटी ४० लाखांवर गेली. स्मृतीला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने जोर लावला होता. मुंबई सोबत दिल्ली कॅपिटल्सने देखील तिच्यासाठी बोली लावण्यास सुरुवात केली. अखेर बाजी मारली ती बेंगळुरू संघाने होय. महिला आयपीएलध्ये करोडपती होणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. मुंबईत सुरू असलेल्या लिलावात आतापर्यंत सर्वाधिक बोली तिच्यावरच लावण्यात आली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत असलेल्या स्मृतीने हा लिलाव टीव्हीवर पाहिला. तिला सर्वाधिक बोली मिळाल्यानंतर संपूर्ण भारतीय संघाने जल्लोष केला. स्मृतीच्या या आनंदात संपूर्ण संघ सहभागी झाला होता. बेंगळुरू संघाने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे स्वागत केले. त्यानंतर स्मृतीने नमस्कारम बेंगळुरू असे उत्तर देत पहिली प्रतिक्रिया दिली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...