यशस्वी जैस्वालने आपले दुसरे द्विशतक पूर्ण करत असताना धडाकेबाज फटकेबाजी केली. कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० फलंदाजीचा नजराणा पेश करताना त्याने खास विक्रमही आपल्या नावावर केला.
यशस्वी जैस्वाल एकदा खेळायला लागला की, त्याला थांबवणे सोपे नसते. ही गोष्ट तिसऱ्या कसोटी सामन्यातही पाहायला मिळाली. कारण या सामन्यात यशस्वी जैस्वालने धडाकेबाज फटकबाजी करत विक्रमी द्विशतक झळकावले. जैस्वालने यावेळी द्विशतक लगावताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले आणि इरादे स्पष्ट केले. यशस्वी जैस्वालचे हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे द्विशतक ठरले आहे. पण हे द्विशतक पूर्ण करत असताना त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यशस्वीने यावेळी एकेरी धाव घेत २३१ चेंडूवर आपले द्विशतक पूर्ण केले. यशस्वीचे सलग हे दुसरे द्विशतक ठरले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातही यशस्वीने द्विशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले.
यशस्वीने शनिवारीच आपले शतक झळकावले होते. पण या शतकाचे सेलिब्रेशन करणे यशस्वीला भारी पडले. कारण हे सेलिब्रेशन करताना यशस्वीचे स्नायू दुखावले गेले आणि त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. त्यामुळे जेव्हा चौथ्या दिवशी फिट झाल्यावर यशस्वी हा मैदानात परतला. मैदानात परतल्यावर यशस्वीने धमाकेदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. यशस्वीने सुरुवातीला आपेल दीड शतक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. दीड शतक झळकावल्यावर यशस्वीने आक्रमकपणे फलंदाजी करायला सुरुवात केली. यावेळीच यशस्वीने जेम्स अँडसनसारख्या अनुभवी गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे यशस्व लवकरच आपले दुसरे द्विशतक झळकावणार, असे दिसत होते. यावेळी यशस्वीने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी भारताच्या नवज्योत सिंग सिद्धू आणि मयांक अगरवाल यांच्या नावावर एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम होता. या दोघांनी एका डावात ८ षटकार लगावले होते. यशस्वीने यावेळी हा विक्रम मोडीत काढला आणि आपले द्विशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी यावेळी अँडसरनला एकामागून एक षटाकर लगावत असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. कारण यशस्वीने इंग्लंडचा हुकमी एक्का अँडसरनवर प्रहार केला होता. त्यामुळे इंग्लंडच्या संघावर दडपण वाढले होते.
यशस्वीने यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये कशी टी-२० स्टाईल फलंदाजी करू शकतो, हे दाखवून दिले. कारण इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजावर तो तुटून पडत होता. अँडरसनपाठोपाठ इंग्लंडच्या अन्य गोलंदाजांवरही प्रहार केला. यशस्वीच्या या द्विशतकाच्या जोरावर भारताला सामन्याच्या चौथ्या दिवशी धावांचा डोंगर उभारून दिला.