पिलीव – माळशिरस तालुक्यातीचल पिलीव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली व शंभराहून अधिक वर्षाची यात्रेची परंपरा असलेली सुप्रसिद्ध जागृत देवस्थान व लाखों भाविकांचे ,जनतेचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी 2026 अखेर विविध कार्यक्रम राबवून साजरी करण्यात येणार आहे.
या यात्रेमध्ये शेतमाल प्रदर्शन खिलार जनावरांचे प्रदर्शन व खरेदी-विक्री गजी ढोल स्पर्धा देवीचा रथ छबीना मल्लांच्या जंगी कुस्त्या आदी कार्यक्रम राबवून दिनांक 1 फेब्रुवारीला सूरुवात होऊन ते 10 फेब्रुवारी 2026 अखेरच्या दिवशी महानैवेद्य व देवीच्या छबीन विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ होऊन यात्रेची सांगता केली जाणार आहे
यात्रेची सुरुवात देवीस महा अभिषेक घालून व कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरापासून पेटीती ज्योत पायी चालत आणून यात्रेस प्रारंभ केला जाणार आहे यात्रेचा खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
एक फेब्रुवारीरोजी देवीचा महाअभिषेक ,जागावाटप व पेटत्या ज्योतीचे आगमन
दिनांक एक फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत शेळ्या मेंढ्याचा व मोठ्या जनावरांचा बाजार सात फेब्रुवारी. पर्यंत जनावरांचा बाजार व खरेदी विक्री
सात फेब्रुवारीरोजी मल्लांच्या जंगी कुस्त्या व जनावरांच्या व शेतमालांच्या निवडीसाठी नोंदी,
आठ फेब्रुवारी रोजी शेतमालांची व जनावरांच्या बक्षीसासाठी निवडी व श्री महालक्ष्मी देवीची सजवलेल्या रथातून श्री महालक्ष्मी देवीची भव्य मिरवणूक,
नऊ फेब्रुवारी रोजी गजीढोल स्पर्धा दहा फेब्रुवारी रोजी श्री महालक्ष्मी देवीस महानैवेद्य, बक्षीस समारंभ व रात्री देवीचा छबिना होऊन यात्रेची सांगता केली जाणार आहे.
यात्रेच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी साळमुख ते पिलीव यात्रा स्थळ,व माळशिरस ते पिलीव यात्रा स्थळ या मार्गावर एसटीची सोय करण्यात आली आहे अधिकृतपणे जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत व्यवस्था केली केली जाणार आहे.
चालू वर्षी देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या दुकानदार हॉटेल, खानावळी ,व्यापारी व छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यासाठी पूर्वीच्या स्टॉलच्या पद्धतीत बदल करून सुटसुटीत अशी व्यापारी पेठ नवीन पद्धतीने करणारं असल्याचे कार्यकारी मंडळाचे व यात्रा कमिटीचे चेअरमन बाबासाहेब उर्फ संतोष कुमार गोविंद पाटील ,व्हाईस चेअरमन नवनाथ रामचंद्र पाटील यांनी सांगितले यात्रा कमिटीचे कार्यकारी मंडळ तत्परतेने यात्रा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत असून या यात्रा कमिटीत चेअरमन बाबासाहेब उर्फ संतोष गोविंदराव पाटील व्हा चेअरमन नवनाथ रामचंद्र पाटील खजिनदार विश्वास श्रावण जावळे नितीन हरिभाऊ कपने
सेक्रेटरी शिवाजी उर्फ दादा महादेव पिसे माळी ,लहू दादा पाटील
जॉईंट सेक्रेटरी सागर बगाडे ,संदीप बगाडे ,कबीर वैजनाथ माने, तसेच संचालक मंडळ
आदी मान्यवर पदाधिकारी चेअरमन व्हा. चेअरमन संचालक मंडळ , सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, खजिनदार हे सर्वजण एकत्रितपणे परिश्रम घेत असून यात्रा सुखकर होण्यासाठी सर्व सोयी सुविधा निर्माण करून यात्रेकरूंना पुरविण्याच्या कामाला लागले आहेत .
फोटो
श्री महालक्ष्मी देवी मंदिर


























