सोयगाव / संभाजीनगर – माणसामधील माणुसकी जीवंत आहे.याचा प्रत्यय सोयगाव शहरात घटली आहे.वडील आजारी होते म्हणून गुरुकृपा मेडिकल सोयगाव येथे गोळ्या घेताना एका व्यक्तीचे पैसे पडलेले होते. ते पैसे आरोग्य दूध दिंगबर वाघ यांना रस्त्याच्या कडेला पडलेले पैसे दिसले.पाहिले तर त्या नोटाच नोटा होत्या.पॉकिट कुणाचे असेल असा विचार करीत शोधाशोध सुरु झाली. व मला कळताच मी त्याच्या मोटारसायकल च्या पाठी मागे शोधत घेऊन मी त्याच्या पाठी मागे घरी आलो.
अखेर पॉकिट मालकाचा शोध लागला आणि ते आमखेडा-आमराई गावातील मिस्तरी काम करणाऱ्या व्यक्ती उद्धव शांताराम कराळे याचे होते.आरोग्य धूत दिंगाबर वाघ यांनी सापडलेले आठ हजार रुपये त्याला परत केले.
अखेर सोयगाव शहरातील डॉ.प्रविण पाटील व्यक्तीच्या समक्ष आठ हजार रुपये असलेले पॉकीट परत करण्यात आले.
यावेळी मिस्तरी काम करणा-या उद्धव कराळे आपले पैसे हरविल्याने विवंचनेतच होते.मात्र पैसे आपल्या घरी पैशासह आणून दिल्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.आजही माणुसकी जीवंत आहे याचा प्रत्यय आरोग्य धुत दिगंबर वाघ सोयगावंकर यांच्या प्रामाणिकतेतून दिसून आला.वाघ हे कोरोना संकटाच्या काळात सुध्दा मोफत उपचार करून देत होता.म्हणून माणुसी आपली माणूसकी अद्यापही विसरला नाही.सापडलेले पैसे परत करुन दिंगाबर वाघ यानी त्याचा प्रत्यय दिला.पंरतु माणुसकी जीवंत असली की कितीही संकटे आली तरी माणुस आपल्यातील प्रामाणिकपणा सोडत नाही याचा प्रत्यय आला.तर आपले हरविलेले पैसे परत मिळणार यावर उद्धव कराळे यांचा विश्वासही बसत नव्हता.
वाघ यांनी प्रामाणिकतेचे कौतुक उद्धव कराळे यांची प्रामाणिकपणे पैसे परत केल्याची वार्ता गावभर पसरली.सर्वत्र कौतूक होऊ लागले.त्याच्या प्रामाणिकतेचे कौतुक सोयगाव सह आमखेडा – आमराई कौतुक करीत आहे.
सोबत फोटो –























