सोलापूर -बार्शीचा योगेश गवारे हा सोलापूर, धाराशिव व लातूर या तीन जिल्ह्यातील शरीरसौष्ठव स्पर्धेतील छत्रपती शिवशंभू श्री चा मानकरी ठरला. बेस्ट पोजरचा मान सोलापूरचा शाबाद नदाफ व मोस्ट इंप्रुव्हडचा मान बार्शीच्या रोहित बुरांगे याने मिळविला.
कुसळंब (ता. बार्शी )येथे छत्रपति फिटनेस क्लब अॅन्ड जिम, छत्रपति प्रतिष्ठान कुसळंब व मित्र परिवार यांच्या वतीने, सोलापूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने कृष्णा काशीद यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ८५ खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धा ६ वजनी गटात घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक गटात ४ बक्षीसे, रोख रक्कम, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सर्व विजयी खेळाडूंना गौरविण्यात आले. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यामध्ये पुन्हा स्पर्धा झाली. त्यात योगेश हा या स्पर्धेचा मानकरी ठरला. त्याला रोख ११ हजार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन बार्शी ग्रामीणचे एपीआय दिलीप ढेरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नाना वाणी, विशाल गरड, सौरभ जगदाळे व धनंजय तऊर आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रमोद काटे, नजीर शेख, गोरख गडसिंग, शकील बडेघर, शरणकुमार कुंभार, रतिकांत पाटील यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
अंतिम निकाल याप्रमाणे (प्रथम चार ): ५५ किलो : प्रदीप पवार (धाराशिव), विकी राठोड( सोरेगाव), लकी मोरे( करमाळा), काशिनाथ देवकते( सोलापूर).
६० किलो: निखिल सोनकांबळे (अहमदपूर), आकाश वाघमारे, रितेश फटफटवाले ( दोघे सोलापूर), लक्ष्मण कंदारे(लातूर).
६५ किलो : योगेश गवारे( बार्शी), व्यंकटेश काळे( सोलापूर), निखिल कबाडे,ओंकार आयतलवाड( दोघे लातूर).
७० किलो : शाबाद नदाफ, हजरतअली शेख( दोघे सोलापूर), नितेश चव्हाण( वेळापूर), संकेत विभूते(सोलापूर).
७५ किलो : तेजस सुळे( लातूर), महमद मणियार( सोलापूर), आफ्रिद शेख, ऋषिकेश आदमाने( दोघे लातूर).
७५ किलोवरील : रोहित बुरांगे( बार्शी), साहिल शेख, सुमित जाधव ( दोघे सोलापूर), अजय माहिते (टेंभुर्णी).

























