धाराशिव / लोहारा – सध्या राज्यभरात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकारणात नवीन अध्याय लिहिणाऱ्या तरुण युवक सुयशकुमार दत्तू दंडगुले यांच्या उमेदवारीच्या चर्चांना गजबजाट सुरू आहे, दंडगुले हे काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून सामाजिक व विविध प्रकारच्या मागण्याना प्राधान्य दिले आहे, त्याच्या या कामगिरीमुळे त्यांच्या या कामगिरीमुळे स्थानिक पातळीवर त्यांना अभ्यासू आणि प्रभावी युवा नेता म्हणून ओळख मिळाली आहे.
लोहारा तालुक्यातील अनेक युवक संघटनांनी सुयशकुमार यांच्या उमेदवारी साठी आग्रह धरला आहे, यामुळे निवडणुकीत उतरण्यासाची चर्चा अधिकच जोर धरत आहे, सध्या सुयशकुमार दडगुले हे भातागळी गटातून निवडणूक लढविणार आहेत, या स्थानिक राजकीय घडामोडीला गती मिळाली आहे, सुयशकुमार हे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा च्या माजी तालुका सरचिटणीस म्हणून कार्य केले आहे, गोरगरीब जनतेच्या विकासकामापासून ते शासनाच्या विविध योजना जनते पर्यंत पोहण्याचे काम केलं आहे.
पक्षाच्या वतीने गावोगाव फिरून मेळावे व बैठका घेऊन मतदार संघात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली असून याच्याकडे तरुण उच्च शीक्षित व प्रामाणिक नेतुत्व म्हणून पाहिले जाते त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मतदारसंघातुन मागणी करण्यात येत आहे,


















