तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरातील विहीरीत पडून तरुण मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या मदतीने तरुणाला विहीरीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी विहीरीच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. हा तरुण अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथील आहे.
आकाश काशिनाथ केंगार (वय 24, रा. पानमंगरूळ ता. अ.कोट) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुंभारी परिसरातील मुजावर वस्ती येथील मौला मुजावर यांच्या शेतातील विहीरीमधील पाण्यात आकाश हा बेशुध्द अवस्थेत मिळून आला. त्यास अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. वळसंग पोलीस ठाण्यातील हवालदार मोरे यांनी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, वडील असा परिवार आहे.