सोलापूर : दुचाकीवर बसून जाताना समोरून येणा-या दुचाकीची धडक लागल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री 9.30 वाजता तुळजापूर ते तिर्थ (ब्रु) दरम्यान घडला.
नागनाथ दत्तात्रय वाघमारे (वय 18 , रा. तुळजापूर) असे तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास नागनाथ हा तरुण दुचाकीवर मागे बसून तुळजापूर ते तिर्थ असे जात होता. त्यादरम्यान समोरून आलेल्या दुचाकीची धडक नागनाथ बसून जात असलेल्या दुचाकीला लागली.
या अपघातात डोक्याला, पायाला आणि चेह-याला जखम झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचार करून गोविंद कांबळे याने मंगळवारी पहाटे 4.30 च्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना सकाळी 7.25 वाजता नागनाथ मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.