सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा मार्ग न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाल्या असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणाचा प्रारूप आराखडा यापूर्वीच निश्चित झाला असून माढा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली तसेच माढा पंचायत समिती १४ गणाची सोडत सोमवारी सकाळी ११ वाजता माढा येथील जगदाळे मंगल कार्यालयात प्रांताधिकारी जयश्री आव्हाड व माढाचे तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. माढा तालुक्यात जिल्हा परिषदचे ७ गट व पंचायत समितीचे१४ गण आहेत. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन हिवाळ्याच्या दिवसात देखील हळूहळू तापणार आहे. इच्छुक उमेदवाराची ज्या त्या पक्षाकडे तिकिटासाठी धावपळ देखील सुरू होणार आहे.
ज्या आरक्षणाच्या चिट्ट्या काढाव्या लागल्या त्या चिठ्ठ्या गौरव जाधव या विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.
चौकट….
माढा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट आरक्षण……
१)भोसरी– सर्वसाधारण महिला २) मानेगाव -सर्वसाधारण ३) उपळाई बुद्रुक – ना मा प्रवर्ग (ओबीसी) महिला ४) कुर्डू – सर्वसाधारण ५) टेंभुर्णी – ना मा प्रवर्ग (ओबीसी) महिला ६) बेंबळे- सर्वसाधारण महिला ७) मोडनिंब – साधारण महिला
चौकट…..
माढा तालुक्यातील १४ पंचायत समिती गण आरक्षण –
१) टेंभुर्णी – अनुसूचित जाती महिला
२) भोसरे – अनुसुचित जाती पुरुष
३) लऊळ – ना मा प्रवर्ग (ओबीसी) महिला
४) दारफळ ना मा प्रवर्ग महिला
५) ऊपळाई (बु)-ना मा प्रवर्ग(ओबीसी)पुरुष
६) कुर्डु – सर्वसाधारण महिला
७) मोडनिंब – सर्व साधारण महिला
८) रांझणी – सर्व साधारण महिला
९) रोपळे (क) – सर्व साधारण महिला
१०) भूताष्टे -सर्वसाधारण पुरूष
११) मानेगांव – सर्वसाधारण पुरूष
१२) बेंबळे – सर्वसाधारण पुरूष
१३) पिंपळनेर – सर्वसाधारण पुरूष
१४) अकोले (खुर्द) – सर्वसाधारण पुरूष