जाफराबाद – तालुक्यातील बोरगाव मठ येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद नगरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शालेय समिती अध्यक्ष श्री शंकरराव घाडगे, महेंद्र वाघ, दत्ता मुळे,पंजाबराव मुळे, राजू काकडे व,योगेश काकडे, पोलीस पाटील संतोष वाघ यांच्या हस्ते बाल आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले.
आनंद नगरीमध्ये एकुण १५ स्टॉल लावण्यात आले होते.त्यामध्ये भाजीपाला,फळे,वडापाव,भजी,चहा,पाणीपुरी,भेळ यांच्यासह अनेक खाद्यपदार्थ चे स्टॉल विशेष आकर्षण ठरली.आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते. प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारे व्यवहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन शाळेने ‘आनंदनगरी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपले आई-वडील कसे काटकसरीने संसार करतात, पैशाचे नियोजन कसे करतात, मेहनतीने मिळवलेल्या पैशाचे मूल्य काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
हा नुसता निखळ आनंद देणारा बाजार नसून यामध्ये अनेक गणितीय संबोध, तार्किक, भावनिक, आर्थिक व्यवहार यांचे देवाण – घेवाण व बालकांची सर्जनशीलता याचा विकास होतो.योग्य असे नियोजन आपणास स्वअनुभवास मिळाले. आज छोटा हिशोब करणारे हात उद्याचे इंजिनियर, डॉक्टर वकील, उद्योगपती असुन अशा उपक्रमातून निश्चितच बालकांचा विकास होण्यास मदत होते चिमुकले व त्यांनी जेव्हा खाद्य पदार्थ बनविले तेव्हा त्यांची मेहनत त्यांच्या कुटुंबाने त्यांना केलेले सहकार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत श्री एस. पी. लहाने यांनी व्यक्त केले.
गावातील समस्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्साह वाढवुन,बाल आनंद नगरी कार्यक्रमाला सहकार्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरगाव मठ यांच्या वतीने मुख्याध्यापक श्री विश्वास वाघमारे यांनी आभार व्यक्त केले


























