माळशिरस – रेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणा-या विद्यार्थीना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतगर्त अभियान कालावधीत दप्तर विना शनिवार रोजी शाळा हा उपक्रम सुरु केला असून शनिवार रोजी विद्यार्थाना पोस्ट विभागाच्या विविध सेवा सुविधा यांचे संपूर्ण प्रात्यक्षिकासह माहिती मांडकी पोस्ट ऑफिसच्या वतीने देण्यात आली.यासाठी पोस्ट विभागाकडून अभिजित निंबाळकर,श्रीधर रणनवरे,विनायक बाबर यांनी उपस्थित राहून विद्यार्थांना उपयुक्त अशी माहिती दिली.
उपस्थितांचे स्वागत सरपंच सचिन काळे,उपसरपंच आनंद शेडगे,ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार काळे,जि.प.शाळेचे शिक्षक चांगदेव पवार,प्रदीप महामुनी,दिलीप पवार,सिद्धेश्वर घुगरे यांनी केले.कार्यक्रमास जेष्ठ नागरिक पंढरी शेंडगे,गणपत शेंडगे,जयसिंग शेंडगे,सचिन पुजारी,दिपक शेंडगे,सागर काळे ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुंभार,विशाल कुंभार संपत शेंडगे,उपस्थित होते. दरम्यान उपसरपंच आनंद शेंडगे हे प्रास्तविक करताना म्हणाले आज हि इंटरनेटच्या युगातही पोस्ट ऑफिस टिकून आहे, त्यांनी ऑनलाइन सेवा, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स सपोर्ट आणि आर्थिक सेवांसारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःला आधुनिक बनवले आहे.
आजकाल, पोस्टमन केवळ पत्रेच नाही तर पार्सल आणि इतर अनेक गोष्टी पोहोचवतात. यामुळे ते आधुनिक जगातही आवश्यक सेवा पुरवणारे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.या उप्रकमा अंतर्गत विद्यार्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना रेडे गावाने मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात सहभाग घेतल्या बद्दल पन्नास पैसेच्या पत्राद्वारे संदेश पोहचविण्याचा संकल्प केला असून सर्व विद्यार्थाना हे पत्र वाटप करण्यात आली.पत्र लिहून झाल्यानतर पोस्टा मार्फत मंत्रालयाच्या पत्त्यावर या सर्व विद्यार्थांची पत्र पाठविण्यात येणार आहेत.त्यामुळे विद्यार्थांना पत्र लेखन हा विषय उपक्रमामुळे प्रत्यक्ष समजला आहे.