नगर शहरातील कै.गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय येथे ७ व ८ ऑक्टोबर रोजी १५ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रम स्थळाची पाहणी स्वागता ध्यक्ष आ.संग्राम जगताप व शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सचिव सुनील गोसावी,खजिनदार भगवान राऊत,संयोजक समिती अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,डॉ.तुकाराम गोंदकर,संपत नला वडे,प्रभाग अधिकारी मेहेर लहारे,गणेश भूतारे आदी पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणले की,७ व ८ ऑक्टोबर रोजी १५ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन कै.गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद कॉलेज येथे करण्यात आले आहे.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी, कवी,लेखक,पुरुषोत्तम भापकर असणार आहेत.हे शब्दगंध साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.या माध्यमातून नगर शहरातील साहित्य चळवळीला चालना मिळेल.नगर शहराला नाट्य,कवी सांस्कृतिक,साहित्य कलेचा वारसा लाभला आहे.हा वारसा असाच अखंडितपणे सुरु राहण्यासाठी शब्दगंध साहित्य परिषद काम करत आहे,असे ते म्हणाले.