Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गत चार वर्षांमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला १०० कोटींहून अधिक नफा

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
गत चार वर्षांमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला १०० कोटींहून अधिक नफा
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सत्ताधारी परिवार पॅनलमधील विद्यमान संचालकांच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार वर्षांमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला १०० कोटींहून अधिक नफा मिळाला आहे, अशी माहिती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे आणि परिवार पॅनलचे सहनिवडणूक प्रमुख जगदीश भुतडा यांनी  पत्रकार परिषदेत दिली. 

          सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीस सामोरे जाताना सत्ताधारी परिवार पॅनलने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. पेंडसे म्हणाले, मार्च २०२१ मध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला ११ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा होता. गेल्या पाच वर्षांमध्ये हा तोटा भरून काढून बँकेने भरीव प्रगती केली. बँकेचा ग्रॉस एनपीए १७.१३ टक्के (१८७.४१ कोटी रुपये) होता. तसेच बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे २०१७ -१८ या आर्थिक वर्षापासून सभासदांना लाभांश देणेही शक्य झालेले नव्हते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये ११ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा भरून काढून विद्यमान संचालकांच्या प्रयत्नामुळे १०० कोटी रुपयांनी अधिक नफा बँकेने मिळवला आहे. यंदाच्या मार्च अखेर देखील बँकेचा नेट प्रॉफिट २५ ते ३० कोटी राहणार आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए ६.५६ टक्के (७३.७३ कोटी रुपये) असून नेट एनपीए ०.३२ टक्के आहे. बँकेने सभासदांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७ टक्के, २०२३-२४ मध्ये ८ टक्के, २०२४-२५ मध्ये ९ टक्के असा चढत्याक्रमाने लाभांश दिला आहे.

           बँकेचा प्रॉव्हिजन कव्हरेज रेशो ९५.४० टक्के आहे. चांगल्या कामगिरीमुळे बँक एसएएफच्या निर्बंधामधून बाहेर पडली आहे. बॅंकेच्या राखीव ठेवी २२० कोटी रुपयांच्या आहेत. नेट वर्थ १९५ कोटी रुपयांचे असून भांडवल पर्याप्तता गुणोत्तर २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर सीडी रेशो ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बँकेने तीन हजार कोटी रुपयांचा मिश्र व्यवसाय केला आहे. बँकेने स्वतःचे मोबाईल बँकिंग सुरू केले असून नेट बँकिंग देखील लवकरच सुरू होणार आहे. बँकचा यूपीआय प्रणालीमध्ये समावेश होणार असून ही सेवा ग्राहकांना लवकरच उपलब्ध होईल. याशिवाय २०२६-२७ या आर्थिक वर्षात बँकेच्या चार नव्या शाखा उघडण्याचा मानस असल्याचेही सुनील पेंडसे आणि जगदीश भुतडा यांनी सांगितले.

          या पत्रकार परिषदेस परिवार पॅनलचे निवडणूक सहप्रमुख, जगदीश भुतडा, उमेदवार सुनील पेंडसे, पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, सी. ए. गिरीश बोरगांवकर, विष्णू मोंढे, सी. ए. आनंद करवंदे, महादेव न्हावकर, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, सुरेश चिक्कळी, प्रमोद भुतडा, ऍड. मिलिंद कुलकर्णी, डॉ. हर्षल डंबळ, अमित आपटे, चरणसिंग चौव्हाण, चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, रवींद्र साळे, जेष्ठ मागर्दशक रंगनाथ बंकापूर, प्राचार्य गजानन धरणे, निवडणूक कार्यालय प्रमुख प्रा. देवानंद चिलवंत, मयांक चौहान, विनायक बंकापूर उपस्थित होते.

बँकेचा एनपीए ०.३२ टक्क्यांवर

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांमुळे बँकेने मोठ्या प्रमाणावर वसुली केली आहे. त्यामुळे बँकेचा नेट एनपीए ८.४७ टक्क्यांवरून ०.३२ टक्क्यांवर आला आहे. हे बँकेच्या आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे असेही सुनील पेंडसे यांनी सांगितले.

बँकेची तुलनात्मक स्थिती –

** मार्च २१ ची स्थिती —

तोटा – ११ कोटी ८६ लाख रुपये

ग्रोस एनपीए – १७.१३ टक्के (१८७ कोटी ४१ लाख रुपये)

नेट एनपीए – ८.४७ टक्के (८३ कोटी ९१ लाख रुपये)

लाभांश – २०१७-१८ पासून दिला नव्हता.

एसएएफ – बँक सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमध्ये होती.

** मार्च २६ ची स्थिती -*

मागील ११ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा भरून काढून ४ वर्षात १०० कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला.

या मार्च एंडला देखील नेट प्रॉफिट २५ ते ३० कोटी रुपये असणार.

** ६ मार्च अखेर –

ग्रोस एनपीए – ६.५६ टक्के (७३ कोटी ७३ लाख रुपये)

नेट एनपीए – ०.३२ टक्के (३ कोटी ३९ लाख रुपये)

लाभांश –

२०२२-२३ – ७% दिला.

२०२३ -२४ – ८% दिला.

२४ – २५ – ९% दिला.

२५ -२६ या आर्थिक वर्षात देखील देता येईल अशी स्थिती.

प्रोव्हिजन कव्हरेज रेशो -९५.४० टक्के

एसएएफ – चांगल्या कामगिरीमुळे बँक सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमधून बँक बाहेर पडल्यामुळे आता कोणतेही निर्बंध नाहीत.

राखीव निधी – २२० कोटी रुपये

नेट वर्थ – १९५ कोटी

सीआरएआर – भांडवल पर्याप्तता गुणोत्तर २० टक्के पेक्षा जास्त

सीडी रेशो – ६० टक्के पेक्षा जास्त

मिश्र व्यवसाय – ३ हजार कोटी 

मार्च २०२६ अखेर नेट एनपीए शून्य टक्क्यांवर येणार हा विश्वास.

Post Views: 118
Previous Post

जि.प.प्राथमिक केंद्र शाळा येथे व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन !

Next Post

करगणीचे दतात्रय पाटील सभापती, उपसभापतीपदी दिघंचीच्या कल्पना पुसावळे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
करगणीचे दतात्रय पाटील सभापती, उपसभापतीपदी दिघंचीच्या कल्पना पुसावळे

करगणीचे दतात्रय पाटील सभापती, उपसभापतीपदी दिघंचीच्या कल्पना पुसावळे

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 28, 2026

मंठा तालुक्यात हायवा टिप्परचा पुन्हा उच्छाद

April 28, 2026

वाफळे येथे भीमशक्ती तरुण मंडळाच्या जिल्हा खो खो स्पर्धा

April 28, 2026

रमाई नगरात गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना

April 28, 2026

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 28, 2026

गाडीला कट मारल्याने दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला

April 28, 2026

सोलापुरात अत्याचार करून धर्मांतर कर म्हणून दिला दबाव

April 28, 2026

श्री सिद्धेश्वर वनविहाराला अचानक लागली आग

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0835635

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697