शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज कॉलेज रोड येथे अमली पदार्थांच्या विरोधात मानवी साखळीच्या आयोजन करण्यात आले होते. शहर काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी या मानवी साखळीमध्ये सहभाग नोंदविला.
नाशिक शहरातील ड्रग्स विरोधी आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल जोपर्यंत अमली पदार्थांचा व्यापार शहरांमध्ये पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता शांत बसणार नाही. नाशिक वाचवा आंदोलन हे या शहरातील तरुणांच्या भविष्या करत आहे आणि ते अविरत चालू राहील असे मत या प्रसंगी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
मोहिमेचे संयोजक राजेंद्र बागुल यांनी शहरात मध्ये गुन्हेगारी वाढली आहे अमली पदार्थांचा साठा वाढला आहे अनैतिक मार्गाने करून जात आहेत या तरुणांचे भविष्य वाचवण्याकरता नाशिक वाचवा ही मोहीम शहरासाठी दिशादर्शक ठरेल या शहरातील भ्रष्टाचार गुन्हेगारी व आपली पदार्थांचा व्यापार समोर उपटून टाकण्याकरता काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहील असे मत व्यक्त केले.